*फडणीस प्राथमिक विद्या मंदिर मध्ये महिला दिन उत्साहात संपन्न*
*फडणीस प्राथमिक विद्या मंदिर मध्ये महिला दिन उत्साहात संपन्न*
कुरुंदवाड (प्रतिनिधी):--- शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सौ. जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड येथे (ता.शिरोळ) जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला .
यावेळी महिला पालकांसाठी "फनी गेम्स" स्पर्धेच्या माध्यमातून उखाणे स्पर्धा ,कपबलून मनोरा स्पर्धा , संगीत खुर्ची स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. उखाणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक दिपाली अमित जंगम, द्वितीय क्रमांक श्रद्धा सुहास बेडक्याळे तृतीय क्रमांक सुप्रिया योगेश व्होरा ,संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये अनुक्रमे वर्षा संदीप खबाले , सुचित्रा गणेश मिणचे , अर्पिता अतुल मगदूम , कप बलून गेम मध्ये अनुक्रमे सारिका मालवेकर हाफिजा बागवान, स्नेहल सुशांत जाधव यांनी क्रमांक पटकावला.
याशिवाय आपल्या स्वतःच्या जीवावर उद्योग- व्यवसाय करीत असलेल्या महिलांचाही यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका काळे मॅडम यांच्या कडून यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन .प्रा.शरदचंद्र पराडकर व संस्थेच्या सेक्रेटरी सीमा जमदग्नी यांची प्रेरणा व स्फूर्ती मिळाली.
विद्यासागर उळागड्डे , अनिल पांडव, दत्तात्रय कुरुंदवाडे , अनिता भोई , मिरामा बाणदार, सुनील पवार , कविता शितोळे , चंद्रकला बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका निला कुलकर्णी व त्यांचा स्टाफ , मालूताई गुरव , बहुसंख्येने महिला पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार कांचनमाला बाबर यांनी केले.