*फडणीस प्राथमिक विद्या मंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न*
*फडणीस प्राथमिक विद्या मंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न*
कुरुंदवाड (प्रतिनिधी):--- शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सर्व . जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड (ता.शिरोळ) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दोन सत्रात उत्साहात संपन्न झाला.
येथील प्राथमिक शाळेमध्ये पहिल्या सत्रात इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आली यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे विश्वस्त श्रद्धा सतीश कुलकर्णी व प्रमुख पाहुणे म्हणून राहुल प्रकाश भोवरे , सुधाकर महालिंग औरवाडे सुरज गुरुदत्त आवटी यांच्या शुभहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली.
इयत्ता तिसरी चौथीच्या द्वितीय सत्रासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सचिव सीमा सुहास जमदग्नी व प्रमुख पाहुणे विशाल दत्तात्रय कोळेकर व रियाज बशीर डमामे प्रमुख उपस्थित होते सर्वच पाहुण्यांनी शाळेविषयी कौतुकाचे उद्गार काढले.
विद्यार्थ्यांच्या भावविश्वातून साकार झालेले कथा , कादंबरी , गोष्ट , चित्र , कार्यानुभव अशा विविध विषयांनी संपन्न असलेल्या *वास्तव* या नियतकालिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नलिनी काळे यांनी केले तर सूत्रसंचालन मिरामा बाणदार व अनिता भोई व आभार कविता शितोळे व दत्तात्रय कुरुंदवाडे यांनी मानले .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा.प्रा.श्री.शरदचंद्र पराडकर यांचे प्रेरणा व स्फूर्ती मिळाली .
यावेळी शाळेच्या कांचनमाला बाबर, विद्यासागर उळागड्डे , अनिल पांडव, सुनिल पवार, मालूताई गुरव, चंद्रकला बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका नीला कुलकर्णी , वर्षा भोसले , सुरेखा शिंदे व स्वाती पाटील एस. पी. हायस्कूलचे शिक्षक , पालक उपस्थित होते.