शिरोळ तालुका शैक्षणिक मंच आयोजित सूर साधना गीतगायनाची मैफिलीस उस्फूर्त प्रतिसाद.
शिरोळ तालुका शैक्षणिक मंच आयोजित सूर साधना गीतगायनाची मैफिलीस उस्फूर्त प्रतिसाद.
कुरुंदवाड:शिरोळ तालुका शैक्षणिक मंचच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील गीत गायनाची व संगीत साधनेची आवड असणाऱ्या शिक्षक बांधवांची कराओकेवर आधारीत सदाबहार गीतांची स्वर मैफिल मंगळवार दि.३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी गिरीश सिनेमा हॉल,कुरुंदवाड येथे पार पडला. एकंदरीत ३३ शिक्षकांचा सहभाग घेतला.यामध्ये विविध प्रकारची मराठी,हिंदी गीतांचा समावेश होता.
प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व प्राथमिक शिक्षकांचे नेते स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या ९४ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.शिरोळ तालुका शैक्षणिक मंचच्या लोगो चे अनावरण लहान मुलांच्या शुभहस्ते करण्यात आले.
संघटना विरहित विद्यार्थी व शिक्षक विकास हा मंच चा उद्देश्य आहे. शैक्षणिक,कला, क्रीडा व सांस्कृतिक अशा विविधांगी क्षेत्रात कार्य करण्याचे नियोजन आहे.
प्राथमिक शिक्षकांना शिक्षण प्रक्रियेत विविधांगी भूमिका वठवाव्या लागतात.शालेय कवितांना योग्य अशा चाली लावाव्या लागतात.मुलांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी अंगभूत असणाऱ्या कलांचा वापर करावा लागतात. शिक्षकांच्यातील उपजत गुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देश्याने सूर साधना स्वर मैफिल संपन्न झाली.शिक्षकांच्यातील गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक,शिक्षिका,रसिक उपस्थित होते. महेश घोटणे व सुरेखा कुंभार यांनी आपल्या सुमधुर आवाजांनी सूत्रसंचलन करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंच च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.