शिरोळ तालुक्यात तंबाखू मुक्त कार्यशाळा संपन्न.
शिरोळ तालुक्यात तंबाखू मुक्त कार्यशाळा संपन्न.
जयसिंगपूर :सलाम बॉम्बे फौंडेशन मुंबई व सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव यांचे सहकार्याने जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिरोळ व सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव यांचे संयुक्त विद्यमाने शिरोळ तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्त कार्यशाळा बळवंतराव झेले हायस्कूल येथे संपन्न झाली.
तंबाखूच्या दुष्परिणामांमुळे अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे.तंबाखूमुळे कॅन्सर सारख्या आजाराला तोंड द्यावे लागते.तंबाखूचे सेवन घातक असूनही त्याचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.ही चिंतेची बाब बनली आहे.शालेय विद्यार्थ्यांनाही हे व्यसन लागू नये. यासाठी शाळेपासूनच तंबाखू मुक्तीची सुरुवात व्हावी.यासाठी सलाम बॉम्बे फौंडेशन कार्यरत आहे.तंबाखू मुक्त शाळेचे निकष व कार्यवाही यांविषयीची कार्यशाळा संपन्न झाली.
गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या नियोजनाखाली कार्यशाळा पार पडली.शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत यांनी तंबाखू व इतर मादक द्रव्यांचे व्यसन शालेय विद्यार्थ्यांना लागू नये. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता स्पष्ट केली. १०० % शाळा तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,एन.व्ही.पाटील, सलाम बॉम्बे फौंडेशनच्या राजमाने मॅडम,रवी कांबळे व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, समग्र शिक्षा अभियानाकडील कर्मचारी उपस्थित होते.