गणपतराव पाटील यांच्या पॅनेलला दत्तवाडकरांचा एकमुखी पाठिंबा *श्री गुरुदत्तचे संचालक बबनराव चौगुले यांची ग्वाही*
गणपतराव पाटील यांच्या पॅनेलला दत्तवाडकरांचा एकमुखी पाठिंबा *श्री गुरुदत्तचे संचालक बबनराव चौगुले यांची ग्वाही*
दत्तवाड/शिरोळ/प्रतिनिधी:
स्वर्गीय सा. रे. पाटील यांच्या नंतर गणपतराव पाटील यांनी कारखाना अत्यंत चांगला चालविला आहे. इतिहासाची पाने निश्चितपणे उघडून पाहायला आणि तपासायला पाहिजेत. क्षारपडीमुळे तालुक्यातील 25 हजार एकर जमीन मृत झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था ही मृता सारखीच झाली होती. याचबरोबर राष्ट्रीय संपत्तीचीही हानी होत होती. दादांनी ही जमीन क्षारपड मुक्त करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर निर्माण केले आहे. त्यामुळे गट, तट, पक्ष न बघता गणपतराव पाटील यांच्या पॅनेलला आम्ही एकमुखी पाठिंबा देत आहोत. त्यांच्या विजयाची जबाबदारी दत्तवाडकरांनी घेतली असून आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहू, अशी ग्वाही श्री गुरुदत्तचे संचालक बबनराव चौगुले यांनी दिली.
दतवाड (ता. शिरोळ) येथे श्री दत्त कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सत्तारूढ पॅनेलच्या संवाद दौऱ्यात ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बबनराव मोटे हे होते.
यावेळी बोलताना राजगोंडा पाटील म्हणाले, देशांमध्ये दत्त कारखाना अभिनय प्रयोग राबवण्यांबरोबरच नवीन तंत्रज्ञान सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. यामुळे लोकांच्या प्रगतीत आणि उन्नतीमध्ये कारखान्याचा मोठा वाटा आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच सर्वांची इच्छा आहे. एन. एस. पाटील यांनी दत्त कारखान्याचा व्यवहार आणि कारभार चांगला चालला असून विरोधाची शक्यता मोडून काढली पाहिजे आणि गणपतराव पाटील यांच्या पॅनेलला एक मताने निवडून दिले पाहिजे असे सांगितले. देवेंद्र सूर्यवंशी, अशोक निर्मळे, सरपंच चंद्रकांत कांबळे यांनीही मनोगततून आपल्या भावना व्यक्त केल्या.
गणपतराव पाटील यांनी सभासदांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे हित जोपासण्यासाठी कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यामुळे सभासदांच्या विश्वासावर आणि पाठिंब्यावर पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा आणि श्री दत्त उद्योग समूहाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी संपूर्ण आढावा घेतला.
सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, महेंद्र बागे, अण्णासाहेब पाटील, सुरेशराव दळवी, डी. एन. सिदनाळे, बी. वाय. शिंदे, जयपाल सिदनाळे, कुमार आडे, बाबुराव पोवार, मलगोंडा पाटील, रावसाहेब पाटील, अशोक पाटील, राजू पाटील, एन. एस. पाटील, विवेक चौगुले, सर्जेराव सोळसे, सुनील कांबळे, मिनाज जमादार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.