आदर्शवत काम करणाऱ्यांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्यास बळ मिळते: प्रो प्रशांत कांबळे
आदर्शवत काम करणाऱ्यांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्यास बळ मिळते: प्रो प्रशांत कांबळे
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ आयोजित नेशन बिल्डर व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्ड वितरण सोहळा उत्साहात.
शिरोळ :प्रतिनिधी : सकारात्मक विचाराने आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळने यापुढेही त्यांनी प्रेरणादायी कार्य करावे याकरिता बळ दिल्याचे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट लिटरसी प्रोमोशनचे सेक्रेटरी रोटे.प्रो.डॉ.प्रशांत कांबळे यांनी केले.
हॉटेल अशोकामधील टारे बॅक्वेट हॉल येथे रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या वतीने आयोजित नेशन बिल्डर व व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्ड वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव हे होते.सर्वांच्या उपस्थितीत विश्वशांती प्रार्थना,राष्ट्रगीत आणि मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
प्रो.प्रशांत कांबळे बोलताना पुढे म्हणाले की मानवी जीवनात प्रत्येकाने स्वतःची आचारसंहिता निर्माण केलीअसेल तर शरीर टिकते.आपण नको ते प्रयोग करीत आहे.शरीर खराब होतं यासाठी शरीराची योग्य ती निगा राखली तरच आपण काही देवू शकतो.सर्व काही निसर्गाचे आहे.सकारात्मक विचारांची गरज आहे.शांत,संयमी असावे.शरीराला लागणाऱ्या सर्व गोष्टी निसर्गाने मोफत दिल्या आहेत.रितीरिवाज योग्य पध्दतीने सांभाळण्याची गरजआहे.शांती,समाधान पैशाने मिळत नाही.तरुण पिढीला संयम शिकविण्याची गरज आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना पृथ्वीराज यादव बोलताना म्हणाले,की शिक्षण क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातील कर्तृत्ववान लोकांनाही पुरस्कार देवून कौतुकाची थाप दिली आहे.रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीने आपल्या लोकोपयोगी कार्यातून समाजात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.विशेषता आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांचे कार्य आदर्शवत ठरत आहे शिरोळच्या वैभवात भर घालण्याचे काम रोटरीकडून होत आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सांगून त्यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्यावतीने यावर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सौ.सविता रामचंद्र रेवडे पुजारी,नितीन बागूल,सौ.उषा खोचरे या शिक्षकांना 'नेशन बिल्डर पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.क्रीडा क्षेत्रात आपले आयुष्य खर्ची घातलेल्या शिवाजी धोंडीराम संकपाळ यांना 'क्रीडाभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहणारे आचारी रघुनाथ दत्तू कदम,महिला कृषी उद्योजिका सौ.कल्पना प्रवीण माळी,आईस्क्रीम विक्रेते लेहरुलाल तेली यांना व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्ड देऊन सन्मान करण्यात आला.
रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर विद्यासागर आडगाणे,पुरस्कार प्राप्त नितीन बागुल,सौ.सविता पुजारी,सौ. उषा खोचरे,सौ.कल्पना माळी,शिवाजी संकपाळ यांनी मनोगत व्यक्त करून आम्ही केलेल्या कार्याचा गौरव रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांनी करून आम्हास पुन्हा सकारात्मक काम करण्याची ऊर्जा दिली असल्याचे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष रोटे. तुकाराम पाटील (भैय्या) यांनी केले.सूत्रसंचलन राजेंद्र प्रधान व व्ही.जी. सुतार यांनी केले.आभार सेक्रेटरी मेजर प्रा.के .एम.भोसले यांनी मानले.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे खजिनदार तथा पत्रकार चंद्रकांत भाट,इव्हेंट चेअरमन संजय रामचंद्र शिंदे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील,माजी अध्यक्ष डॉ.अरविंद माने,संजय तुकाराम शिंदे,सदस्य डॉ.उमेश कळेकर, आप्पालाल चिकोडे,उल्हास पाटील, रणजीतसिंह जगदाळे,अमित जाधव, सुरेश देशमुख,श्रीकांत जाधव,सचिन सावंत,विक्रमसिंह भोसले,भरत गावडे, कुरुंदवाड चे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे,शिरोळचे माजी नगरसेवक एन.वाय.जाधव,उद्योजक सचिन माळी पत्रकार बाळासाहेब कांबळे,दिलीप शिरढोणे, सामाजिक कार्यकर्ते अमरसिंह शिंदे, तुकाराम पाटील,महादेव बिसुरे यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सदस्य,पुरस्कार प्राप्त व्यक्तिंचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.