अलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध म्हणून 18 फेब्रुवारी ला घंटानाद व 11 मार्चला प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन... धनाजी चुडमुंगे यांची कुरुंदवाड येथील पत्रकार परिषदेत घोषणा जलतज्ञ् वडनेरे यांची अलमट्टी बाबत बदललेली भूमिका ही आमच्या पूर परिषदेनंतर च्या पाठपुराव्याचं यश
जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड
कर्नाटक सरकार ने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटर वरून 524 मिटर करण्याची तयारी सुरु केली आहे त्याला सर्व स्तरातून टोकाचा विरोध होणे आवश्यक असल्यामुळे आम्ही याविरोधात जण आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार अलमट्टी च्या उंचीला विरोध करणार आहे असं म्हणत असले तरी याबाबत ते म्हणावे तेव्हढे गंभीर नाही असे दिसून येत आहे. राज्य सरकार ने महापुराची कारणे शोधण्यासाठी वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ् समिती निवडली होती त्या समितीने कोल्हापूर सांगली च्या महापुरास अलमट्टी धरण जबाबदार नाही असा शासनास अहवाल दिला होता. पण मागच्या आठवड्यात त्यांनीच शासनाला पत्र देऊन अलमट्टी च्या बॅक वॉटर चा नव्याने अभ्यास करायची गरज असल्याचे व अलमट्टी, हिप्परगी व नव्याने नदी पात्रातील भराव महापुरास जबाबदार आहेत आणि याचा तांत्रिक अभ्यास करावा म्हणून विनंती केली होती.
त्या पत्राचा आधार घेऊन शासनाने उत्तराखंड येथील शासनाच्या रुरकी या संस्थेला महाराष्ट्रातील महापुराला अलमट्टी, हिप्परगी व कृष्णा नदीवर कर्नाटकात घातलेले बंधारे यांचा हायड्रॉलिक तंत्रज्ञानाने अभ्यास करून याचे बॅक वॉटर बाबत अभ्यासासाठी नेमले आहे.
याचा अभ्यास अहवाल येईपर्यंत कर्नाटक सरकार ने उंची बाबत निर्णय घेऊ नये अशी आपल्या सरकार कडून विनंती केली जाणार आहे पण कर्नाटक सरकार नेहमी आडमुठी भूमिका घेत असल्याचा अनुभव विचारात घेता सरकार ने उंची वाढी विरोधात सुप्रीम कोर्टात जावे असे आमचे मत असून आणि याच्या पाठपुराव्यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना, संस्था व प्रशासकीय अधिकारी यांची समन्वय समिती स्थापन करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे.
अलमट्टीच्या उंचीला सुप्रीम कोर्टात आव्हान न दिल्यास व समन्वय समितीची निर्मिती न केल्यास 18 फेब्रुवारी ला सर्व पुरबाधित गावात घंटानाद आंदोलन व तरीही शासनाने लक्ष न दिल्यास छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी म्हणजे 11 मार्च 2023 रोजी पुरबाधित नागरिकांना घेऊन नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा घाटावर प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलनाची घोषणा धनाजी चुडमुंगे यांनी कुरुंदवाड येथील टेनिस क्लब हॉल येथील झालेल्या पत्रकार बैठकीत केली.
जनरेट्यामुळे वडनेरे यांचे मत बदलले सांगलीची कृष्णा महापूर नियंत्रण समिती व आंदोलन अंकुश चे अभ्यासाद्वारे ठाम मत होते की महापुरास अलमट्टी हिप्परगी जबाबदार आहे पण तज्ञ् याबाबत शाशंक होते पण पूर बाधित नागरिकांच्यासह आमच्या बरोबर असलेल्या जल अभियंत्यांनी अभ्यासपूर्ण अहवालाच्या आधारे महापुरास अलमट्टी हिप्परगी जबाबदार असल्याचे ठामपणे समोर आणल्यामुळेच वडनेरे यांनीही आपले पूर्वीचे मत बदलले आहे.जनरेटा आणि अभ्यासपूर्ण मांडणी मुळेच हे शक्य होऊ शकले असेही धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.
आजच्या पत्रकार बैठकीला निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी अलमट्टी उंची बाबत तांत्रिक माहिती दिली यावेळी सर्जेराव पाटील राकेश जगदाळे दिपक पाटील बाळासाहेब सोमण रशीद मुल्ला प्रभाकर बंडगर अमोल गावडे राजेंद्र चौगुले आप्पा कदम संजय कोरे पप्पू काळे अरुण कोथळी उपस्थित होते.