Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सद्गगुरु बाबा महाराज दतवाड

 जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड





दतवाड परमपूज्य ऋषिकेश आनंद महाराज यांचा आज पिठाभिषेक सोहळा होत आहे त्या निमित्ताने श्री सद्गगुरु बाबा महाराज यांच्या  आठवणी

       लहानपणीच त्यांनी स्वर्गवासी पित्याचा शोधात घराचा त्याग करून गावात आलेल्या साधूंच्या समूहाबरोबर प्रयाण केले बाल वयातच त्यांनी याची पूर्वकल्पना दिली होती पुढे ते साधू जेथे जातील तेथे जाऊ राहिले त्या साधूंना देखील बाल बाबांबद्दल फार आदर होता व ते सर्वजण जाणून होते की हे कोणीतरी अवतारी पुरुषच आहेत त्या साधुनी त्यांना भगवी वस्त्रे धारण करण्याचा आग्रउह केला आणि त्या वस्त्रात ते आणखीनच शोभून दिसू लागले


               बाबांचे बालवयातच तत्कालीन रीती रिवाजा नुसार लग्न झाले होते पुढे ते साधूंच्या बरोबर आळंदीत आले तेथे बाबांना श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रत्यक्ष दर्शन दिले मग बाबांनी त्या साधना सोडून आळंदी येथे एकांत स्थळे राहून ध्यान मग्न अवस्थेत साधना सुरू केली ते काही दिवस आळंदीत राहिले श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्यांनी मग अमृता अनुभव ग्रंथाचे परिशिलन केले पुढे ते नाशिक त्र्यंबकेश्वर असा प्रवास करत हिमालयात जाऊन नेपाळ पर्यंत प्रवास केला नेपाळच्या नरेश यांनी साधूंच्या देशातील दैदीप्यमान दिसणाऱ्या बाबांचे श्रेष्ठत्व जाणले त्यांना महाशिवरात्रीच्या सोहळ्यात प्रमुख केले व त्यांचा योग्य सन्मान केला त्यानंतर बाबांनी प्रवास करीत गिरणार  पर्वतात गेले तेथे त्यांच्या सद्गुरूची भेट झाली व गुरूच्या आदेशाप्रमाणे बाबा दत्तवाड आले त्यावेळी त्यांचे वय फक्त 22 वर्षाचे आसपास होते त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला व गृहस्थ राहून लोकांना ज्ञानोपदेश देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे अनेक शिष्य बनले त्यांची कीर्ती उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रात पसरली कर्नाटकातील काद्रोळी येथील शिक्षक श्री शिवयोगी हे बाबांचे शिष्य झाले याच काळात बाबांनी दत्तवाड येथे एक भव्य धर्मपरिषद आयोजित केली अनेक विद्वान योगी संत महंत या परिषदेला हजर होते त्यात त्यांनी शेवटी ज्ञानोपदेश केला यामुळे बाबांची थोरवी आणखीनच वाढली श्री अदृश्य शिवयोगी यांनी बाबा महाराजांच्या तत्त्वांचा प्रसार आणि प्रचार केला त्यामुळे काद्रोळी हे गाव प्रति कैलास शोभू लागले त्यांच्याच नात्यातील श्री एक अपय्या शिवयोगी यांनी बाबांचे शिष्यत्व पत्करून श्री महाराजांच्या तत्त्वाचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला त्यामुळे उत्तर कर्नाटकातील बाबांची ख्याती आणखीन वाढली बाबांच्या शिष्यात श्री हरिभाऊ परांजपे डॉ रघुनाथराव किर्लोस्कर हे समाविष्ट झाले डॉ किर्लोस्कर यांनी सदबोध पद रत्नहार नावाने एक काव्यग्रंथ लिहिला त्यात श्री बाबा महाराजांची थोरवी करणारी अनेक काव्य आहेत


       ते नेहमी लोकांना वेदांत उपदेश करीत याबरोबरच रोग बाध संकटे दूर करीत कोर्टकचरीतून अनेकांना सोडवले याबरोबरच त्यांच्या पत्नी जगतजननी गोरंबा माता यांच्या अन्नप्रसादाने प्रत्येक लोक तृप्त होत असतात स्वामी विवेकानंद यांच्याबरोबर त्यांची बेळगाव येथे भेट होऊन बंद खोलीत त्यांची  चर्चा झाली होती त्यांचे शरीर वृद्ध काळाकडे झुकू लागले ते म्हणत शरीर दुर्बल झाले तरीही ज्ञाननिष्ठा दुर्बल होत नसते त्यांना शरीराची अवस्था उमगली ते जास्तीत जास्त ध्यानमग्नच राहू लागले त्यांनी कुटुंबांना सांगितले तुम्ही सर्वजण भक्तांच्या सेवेत मग्न राहिलात पुढेही असेच राहा ते काहीही न बोलता ध्यानधारणा व स्वरूपनिष्ठेतच परिपूर्ण झाले तो दिवस शिवरात्रीचा होता सण होते 1919 दतवाड येथे त्यांची भव्य समाधी बांधण्यात आली या ठिकाणी दरवर्षी प्रवचन कीर्तनाचा  महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात येतो त्यानंतर सद्गगुरु बाबा महाराजांचे पीठ अधिकारी म्हणून श्री बसगोंडांना बाबा महाराज यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर त्यांचे चिरंजीव सद्गगुरू   श्री अदृश्य योगी बाबा महाराज यांची नियुक्ती झाली दोन्ही सद्गुरूंनी ज्ञानोपदेश व भक्त उद्धार कार्य शेवटपर्यंतच्या केले आता श्री अदृश्यशिव बाबांचे सुपुत्र श्री ऋषिकेशनंद बाबा महाराज यांचा पिठाभिषेक कार्यक्रम होत आहे सद्गुरु बाबा महाराजांच्या प्रमाणे ज्ञानोपदेश भक्तोधाराचे कार्य करण्यास सदगुरूचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावेत हीच श्री सदगुरू चरणी प्रार्थना