घोसरवाड शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड
घोसरवाड तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळत असते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी या शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असणान्या सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन होणे गरजेचे असते. असे प्रतिपादन घोसरवाड गावचे सरपंच साहेबराव साबळे यांनी व्यक्त केले.
कुमार विद्या मंदिर व कन्या विद्या मंदिर या दोन शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव साबळे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन उपसरपंच हरिष पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या सोहळ्याची सुरवात करणेत आली. दोन्ही शाळांचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व सन्माननीय सर्व सदस्य यांच्या हस्ते शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनी हिंदवी काशिनाथ मोडके, श्रद्धा काकासा पुजारी क्रिडामध्ये जिल्हयास पात्र झालेले विद्यार्थी अलंकार पुजारी कुस्ती 30 किलो वजनी गट, राजरत्न कांबळे - उंच उडी, गायत्री तराळ 200 मी. व ४०० मी. धावणे यांचा सत्कार करणेत आला. यशस्वी सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींना प्रमाणपत्र व बक्षीसे मान्यवरांचे हस्ते देण्यात आली.
सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवर . बाबासो पुजारी माजी सरपंच यांनी कार्यक्रमास रोख रक्कम देवून सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमास डी. ए. जुगळे माजी मुख्याध्यापक ग्रांमपंचायतीचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कुमार - श्री. रामचंद्र नंदिकुरळे कन्या चे अध्यक्ष सौ. दिपाली काकासो पुजारी, खंडू भोरे , गीतांजली संकपाळ, राजू ढोणे, शंकर कुलकर्णी, शितल चव्हाण, वैशाली कुटवटे, राजु तराळ, दिलीप शिरढोणे, सुशांत कांबळे, कुंभार सर,धोंडीराम बाबर, दत्तात्रय कमते, रविंद्र सिदनाळे, सतिश चव्हाण, प्रमोद कांबळे, अमर माळी, अमोल भंडारे, हेमलता जाधव, सरीता वडर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन कुमार शाळेचे व कन्या शाळांचे मुख्याध्यापक यांनी केले.प्रास्ताविक केंद्रप्रमुख रमेश कोळी यांनी केले. स्वागत शामराव कांबळे यांनी केले.आभार संजय निकम यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ जबडे व नंदकुमार पोवार यांनी केले.