विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून भावी वैज्ञानिक घडावेत -आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर
जेडी न्यूज नेटवर्क दतवाड मंदा देशपांडे
विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून भावी वैज्ञानिक घडावेत असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले ते शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ व रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुवर्णमहोत्सवी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटक म्हणून बोलत होते.
विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून भावी वैज्ञानिक घडावेत यासाठी स्मार्ट स्कूल सुध्दा आपल्या मतदारसंघातील प्राथमिक, माध्यमिक शाळामध्ये कार्यान्वित करण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन केले. यासाठी रोटरीचेही सहकार्य घेणार असल्याचे स्पष्ट केले.
विज्ञान हे चिरंतन चालणारे आहे.विज्ञानाच्या आधारावर आपण अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली.विज्ञानाचा वापर कोण कसा करेल यावर त्याची उपयोगिता आहे. अणुशक्तीचा वापर चांगला आणि वाईटही होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीचा वापर आपण कसा करतो ते त्याच्यावर अवलंबून आहे. असे मनोगत गट विकास अधिकारी शंकर कवितके यांनी
अध्यक्षीय भाषण करताना रोटे.शरद पै म्हणाले -विज्ञानाच्या झाडाला या निमित्ताने मदतीचे पाणी घालत आहोत. रोटरीच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी गोविंदराव हायस्कूलचे राजेश पिष्टे यांचे विज्ञान व पर्यावरण यांविषयी सखोल मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.यावेळी 8 वीच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. यामध्ये लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे पथक जनतारा हायस्कूलचे बॅंड पथक,नवजीवन हायस्कूल,बळवंतराव झेले हायस्कूल,लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूलचे वारकरी पथक,ज्ञानगंगा हायस्कूल इत्यादी शाळांचा सहभाग होता.
सुवर्णमहोत्सवी विज्ञान प्रदर्शन भव्यदिव्य व ऐतिहासिक करण्यात आलेले आहे.यातील सेल्फी पॉईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
प्रमुख मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी दिपक कामत यांनी केले.
राजेन्द्र मालू,रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे पदाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील,शिक्षक बॅंक संचालक सुनिल एडके,तालुका विज्ञान समिती अध्यक्षा प्राजक्ता पाटील व सदस्य,केंद्र प्रमुख रमेश कोळी,रियाज चौगले, यशवंत पेठे,दत्तात्रय जाधवर,आण्णा मुंडे,राजू यळगुडे,सलीम अत्तार,सुरेश पाटील,मोज्जम चौगले,शिवाजी ठोंबरे,विविध संघटनांचे,पतसंस्थांचे पदाधिकारी,विज्ञान शिक्षक, प्रयोगशील विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते सुवर्णमहोत्सवी विज्ञान प्रदर्शनासाठी शिक्षक बँक शाखा शिरोळ,साने गुरुजी शिक्षक पतसंस्था,बॅ.खर्डेकर शिक्षक पतसंस्था,शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थांचे बहुमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण पाटील व महेश घोटणे यांनी केले.