Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*अंगणवाडी बालचुमुकल्यांचे स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न*

जेडी न्यूज नेटवर्क मंदा देशपांडे अकिवाट:

          


अकिवाट तालुका शिरोळ येथील सर्व अंगणवाडी बालचुमुकल्यांचा स्नेहसंमेलन कन्या शाळेच्या पटांगणात उत्साहात साजरी झाली.अंगणवाडीच्या सेविका व मदतनीसानी अथक परिश्रमाने लहान मुलांच्या कडून देशभक्ती,लावणी,कोळी गीत, उखाणे,मुखपथनाट्य,भजन, रिमिक्स गाण्यावरील नृत्याची तयारी करून बालकांना संधी दिल्याबद्दल पालक व प्रेक्षकांकडून बालचुमुकल्या बरोबर मदतनीस व सेविकांचे कौतुक केले.

              कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन लोकनियुक्त सरपंच सौ.वंदना सुहास पाटील यांनी केले.तर कार्यक्रमाचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य श्रीराम हुजरे यांनी केले.

        उपस्थितांचे स्वागत कुमार मराठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप पाटील यांनी केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरगदार,उपसरपंच रत्ना सावंत,ग्रामपंचायत सदस्य,पालक वर्ग व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

               लोकनियुक्त सरपंच वंदना पाटील व जेष्ठ पत्रकार गणपती कागे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अंगणवाडी मुलांच्या गुणकौशल्याचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

           या कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविका -शानाबाई रजपूत,नौशादबी मुल्ला,सुमन शिरगांवे,पुष्पा वाळके,रुपाली कोळी,सविता गायकवाड,सलमा मुल्ला, मदतनीस लक्ष्मी माने,तारा माने,रेखा माने,रेश्मा माने,वंदना रजपूत,गीता माने यांनी केले होते.विशेष सहकार्य कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कोळी यांचे लाभले.शेवटी आभार सलमा मुल्ला यांनी मानले.

             संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक कोळी व विद्यासागर उळागड्डे यांनी केले.