विद्यार्थ्यांनो कल्पकतेने जग हातात आणू शकता -खासदार धैर्यशील माने
जेडी न्यूज नेटवर्क दतवाड
शिरोळ तालुकास्तरीय सुवर्णमहोत्सवी विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी खा.धैर्यशील माने बोलत होते. ते पुढे म्हणाले -गरजच अविष्काराची जननी आहे. मानवनिर्मित समस्याचे समाधान विज्ञान शोधते. प्रश्नाचे उत्तर शोधताना दुष्परिणाम होता कामा नये. योग्य दिशेने विज्ञान समजले पाहिजे. शिक्षक हे नेव्हीगेशन आहेत. ट्रेंड युवर माईंड स्वप्न ती जी झोपत नाहित.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वैज्ञानिक असताना राष्ट्रपती बनले ते केवळ बुद्धिमत्तेमुळे. विज्ञानाने केलेला जनतेचे पहिले राष्ट्रपती. विज्ञानावर असलेली निष्ठा व कर्तृत्वावर शक्य झाले.बुद्धिमत्ता योग्य त्या मार्गाने वापरणे आवश्यक आहे.शिक्षक हा प्रत्यक्षात प्रयोगात जगत असतो. प्रत्येकाने आपले गुण ओळखले पाहिजे.विज्ञानाला सोबत घेवून देशाचा विकास करायचा आहे.कल्पकतेने जग हातात आणू शकतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकलेली मुले सुद्धा त्याच ताकदीने पुढे जात आहेत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विज्ञान प्रदर्शन होय.रोटरीने ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले बद्दल धन्यवाद मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.
प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी दिपक कामत म्हणाले, सुवर्णमहोत्सवी विज्ञान प्रदर्शन सुंदर व दिमाखदार सोहळा करण्यात रोटरी ग्रीन सिटी जयसिंगपूर, तालुक्यातील शिक्षक पतसंस्था, शाळा यांचे बहुमोल सहकार्य लाभले. प्रदर्शनात 202 उपकरणांची मांडणी करण्यात आली होती.160 शाळांनी सहभाग घेतला. उपकरणांत विविधता होती. ई -कचरा, सोलर सिस्टीम, विजेशिवाय पाणी पुरवठा, एकाच साधनांमध्ये 27 प्रयोग अशी आकर्षक उपकरणे होती.10,000 हून अधिक विद्यार्थी व पालकांनी लाभ घेतला.
डी.जी.रोटे.अरूणजी भंडारे म्हणाले, - एक वेगळा कार्यक्रम रोटरीच्या माध्यमातून होतोय. या बद्दल संयोजकांचे आभार व धन्यवाद. 136 देशात रोटरीचे कार्य सुरू आहे. अविरत कार्य करणारी रोटरी लिटरसी नेशन. ई -लर्निंगचे कार्य सुरु आहे. भविष्यातही रोटरीचे सहकार्य घ्या.
या प्रसंगी बोलताना अशोकराव माने (बापू) म्हणाले, उर्जितावस्था आणण्यासाठी रोटरी प्रायोजकत्वाचे कार्य करते. सामान्य लोकांच्या हितासाठी स्वतःचे पैसे घालून काम करते. या सुंदर कामाचा अभिमान वाटतो.विज्ञानाच्या माध्यमातून जग पुढे जात आहे.
याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदिप पाटील,उद्योगपती व विश्वस्त बाबूलाल मालू,विनोदजी घोडावत,गौरव मालू,एस.व्ही. कुलकर्णी,आर.एस. कुलकर्णी,डॉ.घोडके,असिस्टंट गहर्नर रोटे.अन्सार चौगुले,सेक्रेटरी रोटे.जयदिप शेट्टी,इव्हेंट चेअरमन
रोटे.शंकर बंडगर, रोटे.दादा चौगुले,रोटे.बजरंग सोमाणी,रोटे.प्रसन्ना पाटील,रविंद्र पोवार,राकेश खोंद्रे,अभिजीत भांदीगरे,अनिल ओमासे, प्राजक्ता पाटील,श्रीशैल मठपती,आबिद पटेल,विनोद पाटील,राहूल पाटील, राजाराम सुतार, उत्तम सुतार, मौजम चौगुले,दिलीप शिरढोणे यांचेसह केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
आभार रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष राजेंद्र मालू यांनी मानले. सूत्रसंचलन महेश घोटणे यांनी केले.