विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत विदयासागर हायस्कुल चे दैदीप्यमान यश
अकिवाट
जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ यांच्या वतीने लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर येथे दिनांक १९ ते २१ जानेवारी कालावधीत आयोजित केलेल्या सुवर्ण महोत्सवी विज्ञान प्रदर्शनात धवल यश संपादन केले आहे.प्रदर्शनात माध्यमिक वैज्ञानिक साहित्य निर्मिती गटात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा निसर्ग व आखिल मानवजातीला होणाऱ्या धोक्याची घंटा व त्यावरील उपाय दाखवणाऱ्या चल प्रतिकृतीस तालुक्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सदर उपकरणाचे कौतुक मा.गटशिक्षणाधिकारी दिपक कामत, मा खासदार धैर्यशील माने दादा यांनी आपल्या भाषणात केली.या उपकरणासाठी कला शिक्षक पी. व्ही नांद्रे,भूगोल अध्यापक आनंदराव पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.यांना सलोनी गोरवाडे, अथर्व कुलकर्णी,श्रेयस बस्तवाडे, सिद्धांत कोथळी,सुयश कोथळी, सुजल कोथळी, मुकेश माने, पुष्कर बेरड या विद्यार्थ्यांनी मोलाची साथ दिली.माध्यमिक अध्यापक शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात अद्यापक श्री दादासो आण्णा सरडे सर यांनी बनवलेल्या बहुउद्देशीय भौमितिक पेटी यांस प्रथम क्रमांक मिळाला.
या सर्व यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. डी. बी. वाडकर, शालेय समिती चेअरमन, सर्व सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले. सदर दोन्ही उपकरणांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.