Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

पंचगंगा नदी प्रवाहित करा राजेंद्र पाटील यड्रावकर


जेडी न्यूज नेटवर्क जयसिंगपूर सुनील कानडे


 प्रदूषणामुळे पंचगंगा नदी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्यामुळे पंचगंगा नदी काठावरील लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, बऱ्याच गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजना पंचगंगा नदीपात्रामधूनच सुरू आहेत, या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उदभवत आहेत, त्याचबरोबर नदी काठावर दूषित पाण्यामुळे मृत माशांचे थर साचत आहेत, आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नदीपात्रातील पाणी प्रवाहित करणे गरजेचे आहे म्हणून पाटबंधारे विभागाने पंचगंगा नदी पात्रातील पाणी तातडीने प्रवाहित करावे अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदवडेकर यांना दिल्या आहेत, कार्यकारी अभियंता रोहित बांदवडेकर यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करत तुळशी बंधाऱ्यातून 100 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्याची माहिती दिली, त्याचबरोबर रुई बंधाऱ्यातील पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत असेही सांगितले, वरिष्ठांना कळवून राधानगरी धरणातून पंचगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत शुक्रवारी सुरुवात होईल  असेही सांगितले आहे, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास दूषित पाणी वेगाने पुढे निघून जाईल व दूषित पाण्याचा नाहक त्रास जनतेला होणार  नाही आणि आरोग्याच्या समस्यांना आळा बसेल, यासाठी तातडीने खबरदारी घ्या व अंमलबजावणी करा अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.