Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

विद्यासागर हायस्कूल मध्ये यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील - डी सी पाटील

 


दतवाड  सौ मंदा देशपांडे 
- शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश हे विद्यार्थ्यांचे परिश्रम  शिक्षकांची हातोटी व पालकांनी घेतलेले कष्ट यामुळे शक्य झाले आहे विद्यासागर हायस्कूल मध्ये  यापुढेही  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन डी सी पाटील  यांनी केले ते पाचवी व आठवी शिष्यवृत्ती प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

            अकिवाड ता शिरोळ येथील विद्यासागर हायस्कूल  मधील विद्यार्थिनी  अनुष्का उळागडे  ही शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावी आली याबरोबरच शाळेतील आठ विद्यार्थी परीक्षेत पात्र होऊन शाळेने दैदिप्यमान यश संपादन केल्याने  विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम विद्यासागर संकुलाच्या प्रांगणात  घेण्यात आला.
          गोमटेश बेडगे, वृषभनाथ  मलिकवाडे, कमलाकर चौगुले, पी ए मगदूम,पालक विद्यासागर उळागड्डे,अनुष्का उळागडे  यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अनिल चौगुले धनपाल कल्याणावर पल्लवी पाटील यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते
 स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक दादासो वाडकर यांनी केले तर आभार डी ए सरडे यांनी मानले सूत्रसंचालन गीताजे यांनी केले.