Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

ग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती प्रशांत पुजारी.

 जेडी न्यूज नेटवर्क मंदा देशपांडे दत्तवाड


ग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती झाली असून आपण सर्वांनी या कायद्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रशांत पुजारी यांनी केले.

वासनोली ता.भुदरगड येथील माध्यमिक विद्यालयात ग्राहक प्रबोधनाचा कार्यक्रम अत्यंत साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुजारी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वास्नोलीच्या उपसरपंच सौ विद्या येडगे होत्या. 

. तसेच संस्था प्रमुख श्री धनाजी पाटील, पत्रकार विक्रम खेंजळे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद ढेकळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करून छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे प्रशांत पुजारी यांनी उपस्थित सर्वांना ग्राहकाची व्याख्या, व्याप्ती, ग्राहक संरक्षण कायद्याची व्युत्पत्ती, त्याची कारणे, कायद्यामधून ग्राहकांना बदलत्या जीवनशैली प्रमाणे उत्पन्न होणाऱ्या विविध समस्या, त्यांचा निपटारा होण्यासाठी कायद्यान्वये मिळालेले विशेष हक्क, अधिकार, उत्पादक, व्यापारी यांच्या कायद्यामुळे बदललेल्या जबाबदाऱ्या, विविध स्तरावरील ग्राहक न्यायालये, त्यांची कार्यशैली, ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून फसलेल्या ग्राहकांना मिळणारा योग्य सल्ला, सहकार्य, मदत याबाबत अतिशय सखोल मार्गदर्शन केले. तसेच ग्राहकांची सर्वच प्रकारच्या मार्केट मध्ये नेमकी कशा प्रकारे फसवणूक केली जाते, ते टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजनांचा वापर करायचा याबाबत अनेक उदाहरणासह उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सदस्य रमेश पाटील, तालुकाध्यक्ष दयानंद सुतार, संजीवनी सुतार, प्रिया जाधव, तसेच शाळेचा सर्व स्टाफ, शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, भागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेच्या वतीने ग्राहक भैरव हा अंक भेट देण्यात आला .या कार्यक्रमास शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.