ग्राहकांनी त्यांच्या हक्कांचा आणि कर्तव्याचा जरूर वापर करावा-- प्रशांत पुजारी.
जेडी न्यूज नेटवर्क मंदा देशपांडे --
कडगाव येथील विद्यालयात अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे ग्राहक प्रबोधनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस आर पाटील होते. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ पदाधिकारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रशांत शरद पुजारी हे उपस्थित होते.
दिप प्रज्वलन करून श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख वक्ते प्रशांत पुजारी यांनी उपस्थित सर्वांना ग्राहकाची व्याख्या, व्याप्ती, ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती प्रक्रिया, कायद्यामधून ग्राहकांना बदलत्या जीवनशैली प्रमाणे उत्पन्न होणाऱ्या विविध समस्या, त्यांचा निपटारा होण्यासाठी कायद्यान्वये मिळालेले विशेष हक्क, अधिकार, विविध स्तरावरील ग्राहक न्यायालये, त्यांची कार्यशैली, फसलेल्या ग्राहकांना मिळणारा योग्य सल्ला, सहकार्य, मदत याबाबत अतिशय सखोल मार्गदर्शन केले. तसेच सध्याच्या काळात देशाच्या ग्लोबल मार्केट पॉलिसी मुळे ग्राहकांची सर्वच प्रकारच्या बाजारात मध्ये नेमकी कशा प्रकारे फसवणूक केली जाते, ते टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजनांचा वापर करायचा याबाबत अनेक लहान मोठ्या उदाहरणासह उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सदस्य रमेश पाटील, तालुकाध्यक्ष दयानंद सुतार, संघटक बाळासाहेब पाटील, मार्गदर्शक टी बी पाटील , संजीवनी सुतार, प्रिया जाधव, तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या निमित्ताने विद्यालयाच्या मुख्याध्यापकाना अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेच्या वतीने ग्राहक भैरव हा अंक भेट देण्यात आला आणि कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.स्वागत व सूत्रसंचालन श्री गजानन देसाई यांनी केले.प्रास्ताविक संजीवनी सुतार यांनी केले.आभार आर.के.फुटाणे यांनी मानले.
========================