कोळी जमातीतील नूतन सरपंच, सदस्य, नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न
जेडी न्यूज नेटवर्क मंदा देशपांडे दतवाड
कोल्हापूर जिल्हा समाज विकास मंडळ व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यातील नवनिर्वाचित संरपंच,सदस्य व नगरसेवकांचा सत्कार जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कोळी हे होते.
गट -तट विसरून एकत्र होणे काळाची गरज आहे. 25 जानेवारीच्या आक्रोश महामोर्चास मोठया संख्येने सहकुटुंब उपस्थित राहणेचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी जिल्हा सचिव रमेश कोळी, विजय आरगे, पोपट पुजारी, भगवान कोळी, अनिल तराळ,अशोक कोळी, सुनिल कोळी, शहाजी कोळी, मारुती कोळी, बाळासो कोळी,अविनाश कोडोले, विद्याशंकर कोळी,दिलीप शिरढोणे यांचेशिवाय विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.