Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त 2350 जणांचे रक्तदान

 कुरुंदवाड 


श्री गुरुदत्त शुगर्स चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांच्या व्हॅलेनटाईन डे दिवशी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त “चला माणूसकिवर प्रेम करूया, रक्तदानातून जीवनदान देऊया” हे बिद्र घेऊन आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात 2350 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक तर होत आहेच व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदानांचे प्रबोधन होण्यास मदत झाली आहे. चेअरमन माधवराव घाटगे यांच्या प्रोत्साहनातून व बंधू धीरज घाटगे यांच्या मदतीने दरवर्षी महारक्तदान शिबिराची संकल्प राहूल घाटगे यांनी जपले आहे.
श्री. घाटगे यांच्या १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित दर वर्षी विविध गावामध्ये महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. तरुणांच्या बलस्थांनाचा उपयोग सामाजिक उपक्रमाला देण्यासाठी हे रक्तदान शिबिर महत्वांची भूमिका पार पाडत आहे. या रक्तदान शिबिरामध्ये महिला व तरुणींचा ही मोठा सहभाग होता. वाढदिवसानिमित्त गेल्या चार वर्षात ८५०० रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करुन शुभेच्छा दिल्या. 

अनेक गरजु रुग्णांना ही गुरुदत्त शुगर्स च्या माध्यमातून आतापर्यंत रक्ताचा पुरवठा करण्यात आलेला आहे. राहूल घाटगे यांनी वाढदिवसाच्या माध्यमातून गुरुदत्त चे सामाजिक बांधिलकीची पंरपरा कायम ठेवली आहे.
कारखाना परिसरातील खिद्रापूर, राजापूर, बस्तवाड, मजरेवाडी, अकिवाट, सैनिक टाकळी, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळीवाडी, दत्तवाड, घोसरवाड, हेरवाड , चिंचवाड, जयसिंगपूर ,कल्लोळ आदी गावामध्ये हे शिबिर पार पडले. सर्वच रक्तदात्यांचे व महारक्तदान शिबिरसाठी मेहनत घेतलेल्या सर्व मित्रांचे राहूल घाटगे यांनी आभार मानले.