खिद्रापूर येथील डाकपाल टाटाजी कागवाडे यांचे वर बडतर्फीची कारवाई करा.
खिद्रापूर :
तकलादु कार्यवाहीच्या निषेधार्थ चौकशी व्हावी व खिद्रापूर येथील डाकपाल टाटाजी कागवाडे यांचे वर बडतर्फीची कारवाई करावी या मागणीसाठी खिद्रापूर येथील गणेश पाखरे यांनी कसबा बावडा कोल्हापूर येथील मुख्य पोस्ट ऑफिसच्या दारात आज पासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सविस्तर हकीकत अशी की, मौजे खिद्रापूर हे गाव 2019 च्या महापुराने पीडित झालेले. अभिनेता सलमान खान यांनी दत्तक घेतले. महापुरामध्ये पडझड झालेल्या घरांच्या बांधकामासाठी सलमान खान यांचे मार्फत हरियाणा येथील ऐलान फाउंडेशन ने पुढाकार घेतला. गावातील घरकुलांच्या कामकाजाचे नियोजनासाठी हेल्पर म्हणून खिद्रापूर येथील डाकपाल टाटाजी कागवाडे यांचे चिरंजीव असिफ कागवाडे याचे वर जबाबदारी सोपवली. घरकुल लाभार्थ्यांची कागदपत्रे बनवणे ती पाठवणे फाउंडेशनच्या खात्यावरती रकमा जमा करणे. आधी कामाचे नियोजन असिफ कागवाडे हा करत होता. तत्कालीन सरपंच हैदर खान मोकाशी यांचे सांगणे वरून उपोषणकर्ते गणेश पाखरे यांच्या पत्नी खिद्रापूरच्या प्रथम महिला माजी सरपंच गीता पाखरे ह्या पोस्ट ऑफिस मध्ये पैसे भरावयास गेल्या असता त्यांना अपमानास्पद वागणूक देत टाटाजी कागवाडे व त्यांचा चिरंजीव असिफ कागवाडे या दोघांनी मिळून धक्के देत त्यांना पोस्ट ऑफिस मधून बाहेर काढले. एका महिलेला अपमानास्पद वागणूक देणे तिला पोस्टामधून धक्के देत बाहेर काढणे, धमक्या देणे, भीती घालणे अशी लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या डाकपाल टाटाजी कागवाडे याचे विरोधात यासंदर्भात कसबा बावडा येथील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये तक्रार दिली असता त्या तक्रारीची चौकशी सुरुवातीस करण्याचे टाळण्यात आले. मात्र दिलेल्या अर्जावर चौकशी न केल्याने दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर इचलकरंजींचे सहाय्यक अधीक्षक अभिजीत जाधव यांनी चौकशी करण्याचे नाटक केले व सदर संदर्भात केवळ समज देऊन बोळवण करण्याचे काम त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. एखाद्या डाकपालने लाजिरवाणे न शोभणारे असे कृत्य करावे आणि त्याला केवळ समज द्यावी हे डाक विभागाच्या कारभारास न शोभणारे अमानवी कृत्य करणाऱ्या डाकपालाला पाठीशी घालने हे कृत्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना न शोभणारे असल्याने त्यांचेही विरोधात कोल्हापूर येथील कसबा बावडा पोस्ट ऑफिसच्या मुख्य कार्यालयासमोर आजपासून कार्यवाही व्हावी याकरिता गणेश पाखरे यांनी उपोषण सुरू केले आहे.