जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेबरोबरच क्रीडा नैपुण्यातही अग्रेसर -अनिल ओमासे
जेडी न्यूज कोल्हापूर
घोसरवाड: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळा शिष्यवृत्ती, नवोदय,एनएमएमएस सारखा स्पर्धा परीक्षेत शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केलेल्या आहेत. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातही आपले नैपुण्य दाखवून दिले आहेत. याचा सार्थ अभिमान वाटतो. कन्या विद्या मंदिर घोसरवाड शाळेत गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे बोलत होते.
.श्रध्दा काकासो पुजारी हिने इयत्ता 5 वी शिष्यवृत्तीधारक झाले बद्दल तसेच .गायत्री राजेंद्र तराळ हिने जिल्हास्तरीय 400 मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. युवा साम्राज्य फौंडेशन शहापूर मॅरेथॉनमध्ये 4 था क्रमांक,टाकळी मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी पूर्ण केलेबद्दल अनिल ओमासे यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.
याप्रसंगी केंद्र प्रमुख रमेश शंकर कोळी,केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे,विषय तज्ज्ञ शंकर बरगाले, मार्गदर्शक शिक्षक रमेश मारूती कोळी,गुंडा परीट,गांधी कांबळे,विद्याधर मोकाशी, ज्योती परीट,निर्मळे मॅडम, नयना गुरव,काकासो पुजारी, बाळू यादव, रविंद्र सिदनाळे, तालुका प्रसिद्धी प्रमुख दिलीप शिरढोणे उपस्थित होते.