Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

अतिक्रमण मुक्त नरसिंहवाडी साठी सर्वांनी सहकार्य करावे - अमोल पुजारी

 जे डी न्यूज कोल्हापूर


नृसिंहवाडी  ,येथील ग्रामपंचायतीने दत्तक्षेत्रावरील अतिक्रमणाबाबत आक्रमक भूमीका घेण्याचा निर्णय घेतला आहे तसेच सर्व प्रकारच्या छोट्या-मोठ्या दुकानदारांनी व उपहारगृहचालकांनी या प्रश्नी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे

             याबाबत उपसरपंच अमोल पुजारी यांनी सोशल मीडिया द्वारे ग्रामस्थांना तसेच व्यापारी नागरिक यांना रहदारीस अडथळे होणारे दुकानदारांचे साहित्य डिजिटल बोर्ड अन्य साहित्य स्वतःहून काढून घेऊन यात्रेकरूंना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात व ग्रामस्थांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी आवाहन केले आहे

   येथील दत्तक्षेत्रावर ठिकठिकाणी तसेच स्वागत कमान ते दत्त मंदिर वेश व अन्य रहदारीच्या मार्गावर अनेक दुकानदारांनी साहित्य फलक ठेवले आहेत विठ्ठलमंदिर परिसर, भाजी मंडई मंदिराकडे जाण्याचा मार्ग या ठिकाणी विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या स्टॉल धारकांनी व्यापाऱ्यांनी सीमाच ओलांडली आहे असा आरोप स्थानिक नागरिकाकडून  होत आहे काही ठिकाणी येण्या जाण्यासाठी बोळाचे रस्ते होते ते अतिक्रमणामुळे बंद होण्याचा मार्गावर आले आहेत 

      यापूर्वी ग्रामपंचायतीने अतिक्रमणाबाबत कारवाई करून काही दुकानदारांचे साहित्य जप्त केले होते एक दोन दिवस कारवाई केली व नंतर ती बंद पडली आता नुसता फार्स न करता  कठोर भूमिका घ्यावी असे मत भाविक तसेच नागरिकांचे आहे

  येथे रोज दत्त दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांची संख्या लक्षात घेता अतिक्रमणतातडीने काढणे आवश्यक आहे          ग्रामपंचायत ने यापूर्वी जागा किती दिली होती व सध्या किती आहे याचाही पंचायतीने आढावा घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे 

    वाढत्या अतिक्रमामुळे येथे येणाऱ्या भाविकांना ग्रामस्थांनाही येण्या जाण्या बरोबर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा होतो मुख्य चिंचेचे बनात दुचाकीच्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे येथे कायमपणे दुकाने भाजी बाजार यामुळे येथे रहदारी करणे अवघड झाले आहे

अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे....!

     या तीर्थक्षेत्रावर दिवसेंदिवस दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे याचा विचार करून ग्रामस्थाबरोबर भाविकांनाही सोयी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने वाढत्याअतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत ठोस कारवाई करणार आहे तत्पूर्वी नागरिकांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा  ग्रामपंचायतीला ठोस तसेच कडक भूमिका घ्यावी लागेल