Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

मातृ पितृ पूजन कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न

 कुरुंदवाड (प्रतिनिधी)


 शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सौ. जानकीबाई रामचंद्र फडणीस  प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड (ता.शिरोळ) शाळेमध्ये गीता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक प्रेम दिनानिमित्त मातृ-पितृ पूजन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात  करण्यात आले.
                 प्राचीन काळापासून पालकांना सर्वोच्च स्थान दिले गेले आहे.  अनादिकालापासून महापुरुषांनी आपल्या जीवनात आई-वडिलांचा आणि सद्गुरूंचा आदर केला आहे.  आई-वडिलांचे स्थान देवासारखे असते असे म्हणतात.  आई-वडील हेच देवाच्या आशीर्वादाच्या रूपाने आपल्यासोबत राहतात.14 फेब्रुवारीला फुल घेऊ नका तर हृदय घ्या, पूजेचे साहित्य घेऊन आई बाबांच्या चरणी या, म्हणजे तुमची दृष्टी शुद्ध होईल.  बाकी सर्व सापडेल पण पालक सापडणार नाहीत.म्हणूनच  येथील प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथी इयत्ता मधील सर्व विद्यार्थ्यांच्या माता व पित्यांना शाळेमध्ये आमंत्रित करून त्यांचे विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने "गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः" या मंत्राचा जयघोष करीत आपल्या शिक्षकांचे व मातापित्यांचे पूजन व आरती करुन अभिवादन केले.

                  या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा प्रा श्री शरदचंद्र पराडकर व संस्थेच्या सेक्रेटरी मा सौ सीमा जमदग्नी मॅडम यांचे प्रेरणा व स्फूर्ती मिळाली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नलिनी काळे मॅडम, कांचनमाला बाबर,  मिरामा बाणदार, अनिता भोई, रेखा औरवाडे, विद्यासागर उळागड्डे, अनिल पांडव, दत्तात्रय कुरुंदवाडे, सुनील पवार, मालूताई गुरव आदि शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे माता-पिता व विद्यार्थी उपस्थित होते.