ज्ञान सप्ताहला उत्साह व भक्तिमय वातावरणात सुरुवात
जे डी न्यूज कोल्हापूर
दतवाड येथील श्री सदगुरू बाबा महाराज ज्ञानसप्ताह चा कार्यक्रम पालखी आगमनाने उत्साहात सुरू झाला गेली शंभर वर्षाची परंपरा असणाऱ्या हा कार्यक्रम आठवडाभर चालतो महाशिवरात्री दिवशी पालखी सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी दत्तवाड सह काद्रोळी मदहळी, मतिकोप, मर्कट्टी ,हळीहोसूर ,हुक्केरी ,यादनवाडी टेक चंदूर ,दानवाड ,खिद्रापूर, हेरवाड ,राजापूर, राजापूर वाडी येथील भक्त उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण कर्नाटक यांच्या संगमावरील श्री सदगुरू बाबा महाराज मठातील या ज्ञान सप्ताह श्री ऋषिकेश आनंद महाराज यांच्या अमृतवाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मुख्य श्री ब डॉक्टर पालाश शिवयोगी अदृश्य योगी आश्रम सिमी मठ काद्रोळी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत तर या ज्ञानसाप्ताहात बाळगोंडा पाटील चंदुर ,ललितामाताई सिद्धूरूढ आश्रम कल्लूर, श्री वामदेव अदृश्यशयोगी आश्रम , सिद्धू रूढ शरण हिप्परगी, रामशरण बेनवाड, बसवराज महास्वामी केरेकटी ,मारुती शरण कंकणवाडी ,यांचे यांचे दर्शन व आशीर्वचन होणार असून सुधाकर पाटील महाराज चंदुर यांचे प्रवचन तर ऋषिकेश बोडस मिरज यांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम तर दिनांक 23 रोजी जागरण व दिनांक 24 रोजी गावातील प्रमुख मार्गावरून पालखी व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे
दरवर्षी चालणाऱ्या या ज्ञान सप्ताहाचा सर्व भक्तांनी लाभ घेऊन प्रवचन कीर्तन व अमृत वचनाला हजर राहून महाप्रसाद घ्यावा असे आव्हान श्री सदगुरू बाबा महाराज मठात मार्फत करण्यात आले आहे