दत्तवाड येथे आरोग्य शिबिर संपन्न
जे डी न्यूज कोल्हापूर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त (दत्तवाड ता. शिरोळ) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीमार्फत देशभक्त रत्नाप्पांना कुंभार सभागृहामध्ये मगदूम एण्डो- सर्जरी इन्स्टिट्यूट कोल्हापूर तर्फे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले।या शिबिरामध्ये मूत्ररोग निदान आणि उपचार त्याचबरोबर किडनीस्टोन, प्रोस्टेट, लघवी नकळत जाणे, लघवीतून रक्त जाणे, थंडी वाजून ताप येणे, किडनी खराब होणे, अंगावर सूज येणे, लघवीचा मार्ग लहान होणे इत्यादी त्रास असणाऱ्या रुग्णां ची शिबिरात मोफत तपासणी डॉक्टर विश्वनाथ मगदूम डॉक्टर योगिता नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी 65 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे पुरवण्यात आली तर या रुग्णांपैकी सात रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने त्यांना कोल्हापूर येथे दाखल होण्यासाठी सांगितले आहे तेथे शासकीय योजनेतून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे
या शिबिराचे आयोजन महात्मा गांधी तंटामुक्त समिती दत्तवाड यांच्यामार्फत करण्यात आले होते यावेळी समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील सरपंच चंद्रकांत कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, बाबुराव पवार बसगोंडा पाटील राजू पाटील गोमटे अशोक पाटील टाकवडेकर चंद्रशेखर कलगी नितीन खरपी ग्रामसेवक संतोष चव्हाण सिद्धेश वालावल्कर , प्रियंका कवाळे, विजय कुरणे, प्रियांका देसाई. यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते