प्रशासनाने शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात* *आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर*
जेडी न्यूज कोल्हापूर
शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने नागरिकांचे प्रबोधन करावे, अधिकाऱ्यांनी योजनेची माहिती सांगताना गरीब गरजू लाभार्थीना मार्गदर्शन करावे व शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात असे आवहान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले,शासनाच्या अमृत महाअवास योजना अभियान अंतर्गत शिरोळ तालुक्यासाठी मंजूर शंभर घरकुलांचा पायाखुदाई शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपन्न झाला यापैकी कोथळी येथील मंजूर दोन घरकुलांचा पायाखुदाई शुभारंभ शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते,
ग्रामीण भागात बेघरांना या योजनेअंतर्गत तीनशे स्क्वेअर फुटाचे पक्के घर बांधण्यासाठी शासनाकडून एक लाख चाळीस हजार रुपयांचा निधी या योजनेमधून दिला जातो, गरजू नागरिकांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या स्तरावरून पाठवले जातात, या योजनेतून रविवारी शंभर घरांचा पायाखुदाई शिरोळ तालुक्यातील गावा गावांमध्ये संपन्न झाला शासनाच्या आदेशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंजूर प्रकरणामधील घरांची पायाभरणी करावी असे आदेश प्रशासनाला दिले होते,
गरीब व गरजू घटकाला ही योजना लाभदायी ठरणारी आहे प्रशासनाने ग्रामीण भागातील जनतेला याचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या,
कोथळी येथे पार पडलेल्या या समारंभास सरपंच भरतेश खवाटे, उपसरपंच सौ राजश्री सुतार, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनगोंडा पाटील, शिरोळ तालुका विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे, शिरोळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संकपाळ साहेब, ग्रामसेवक, आर एस नाईक, देवगोंडा पाटील (थबगोंडा), रवी पुजारी, वैभव इंगळे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.