विद्यार्थ्यानी शिक्षणाबरोबर स्मार्ट होणे गरजेचे आहे- बोरीगिड्डे
जेडी न्यूज कोल्हापूर संपादक सौ मंदा देशपांडे दत्तवाड--
विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे हल्लीचे विद्यार्थी मोबाईल टी.व्ही.च्या वापरामुळे अनेक गुन्हेगारी वृत्ती कडे वळत आहेत. या कडे पालकांनी लक्ष द्यावे . असे शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर डी. एस. बोरीगिड्डे म्हणाले ते टुलिप्स प्री प्राइमरी स्कूलचा ॲन्युअल डे कार्यक्रमात बोलत होते . यावेळी.श्री.एस.डी.चौगुले यांनी ही विद्यार्थ्यांचे कला गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करावे टी.व्ही.वरील सिरीयल एकमेकांचे द्वेष दाखवले जातात त्यापेक्षा छत्रपती संभाजी राजे सारखे चांगले सिरीयल पाहायला हरकत नाही. त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाविषयी पालकांना माहिती सांगितले . वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना व पालकांच्यासाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी पालकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रधान करण्यात आले. नूतन सदस्य हळीगळे यांनी ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम सारखे शाळा बिरनाळे कुटुंबियांनी काढून धाडसाचे काम केले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीची गोडी लावली ही खरोखर कौतुकाची बाब आहे.असे गौरवोद्गार काढले.तसेच अकिवाट चे लोकनियुक्त सरपंच . सौ. वंदना सुहास पाटील व सदस्य सौ. वैशाली चौगुले यांनी कार्यक्रम साठी शुभेच्छा दिले
विद्यार्थ्यांनी कलागुण यावेळी सादर केले शाळेचे प्रिन्सिपल सौ. वर्षा बिरनाळे त्याचबरोबर शाळेचे अध्यक्ष .श्री. प्रशांत बिरनाळे संचालक श्री प्रमोद बिरनाळे व मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती पुष्पा बिरनाळे विद्यार्थी पालक शिक्षक स्टाफ उपस्थित होता.