Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

कणेरी मठावर होणाऱ्या भव्य अशा पंचमहाभूत लोकोत्सव सुमंगल कार्यक्रमासाठी वि . मं.टाकळीवाडीच्या विध्यार्थी व ग्रामस्थांनी दिली भरघोस मदत..

जेडी न्यूज नेटवर्क दतवाड


 टाकळीवाडी ता शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर कडून   कणेरी मठ  येथे होणाऱ्या पंचमहाभूत लोकोस्तव सुमंगल या कार्यक्रमासाठी अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी  हा उपक्रम राबविण्यात आला.

यासाठी *२ पोती तांदूळ.    १ पोती ज्वारी.  १ पोती गहू.               साखर ५० किलो.        गूळ -२५ किंलो.   कडधान्ये -५० किंलो.          साडी नग -७५ .  तट, वाटी ३०नग .शॉल २५ नग त्यादी साहित्य देण्यात आले .  या कार्यक्रमासाठी राज्यातून, देशातून सुमारे दररोज दहा लाख लोक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . 

     अन्नधानाची टंचाई भासू नये भोजनाची व्यवस्था व्हावी या हेतूने आज साहित्य देण्यात आले.

     हा कार्यक्रम 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 असे सात दिवस हा कार्यक्रम चालणार आहे.

   शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ   दळवी सर, बाबर सर, कमते सर मदन कांबळे सर, दळवी मॅडम, कांबळे मॅडम, कोल्हापुरे मॅडम, गायकवाड मॅडम, हे सर्व शिक्षक व अभिजित बंडगर व ज्योती भातमारे कणेरी मठ स्वयं सेवक यांनी नियोजन केले.