Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

विज्ञान प्रदर्शनात उर्दू खिद्रापूर जिल्ह्यात तृतीय, राज्यासाठी निवड.

जे डी न्यूज नेटवर्क दत्तवाड 


 जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर व  बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप यांचे संयुक्त विद्यमाने , अशोकराव माने पॉलिटेक्निक वाठार तर्फ वडगाव  येथे N.C.E.R.T. दिल्ली यांचे मार्फत निश्चित केलेल्या विषयांतर्गत 6,7 व 8 फेब्रुवारी 2023 रोजी सुवर्ण महोत्सवी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. यात उच्च प्राथमिक गट( 6वी ते 8 वी) मध्ये उर्दू विद्या मंदिर खिद्रापूर शाळेच्या विद्यार्थीनी आफिरा अब्बास घुनके व आरिफा हमीद जमादार यांनी विषय शिक्षक मुहम्मदआसिफ खलील मुजावर यांच्या मार्गदर्शना खाली "वीज विरहित पाणी पंप" या उपकरणाचे सादरीकरण करून, जिल्ह्यात तृतीय क्रमांक संपादन केले व या उपकरणाची राज्यासाठी निवड झाल्या बद्दल शिक्षक "आमदार जयंत आसगावकर", माध्यमिक शिक्षणाधिकारी  एकनाथ आंबोकर, शिक्षक नेते दादासो लाड, कोजिमाशि चे उपाध्यक्ष शरद तावदारे सर,  मनोहर परीट, दत्तात्रय घुगरे व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देवून विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले.


यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नाजिम जमादार, शिक्षक, बुशेरा पटेल,अंजुमआरा बुखारी,  रियाज बाणदार, मठपती सर, केंद्रप्रमुख रियाज अहमद चौगले, उर्दू विस्तार अधिकारी मुसा सुतार, विज्ञान विभागप्रमुख, विस्तार अधिकारी,पं स शिरोळ अनिल ओमासे, गटशिक्षणाधिकारी पं स शिरोळ दिपक कामत, यांचे मार्गदर्शन लाभले