Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

शेवटी सीबीएसवर गारगोटी मार्गाच्या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म मिळाला..* *श्री प्रशांत पुजारी यांची मागणीला यश*

जेडी न्यूज नेटवर्क दतवाड


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या कोल्हापूर येथील मुख्य बसस्थानक (सीबीएस) येथे गारगोटी मार्गावर जाणाऱ्या प्रवाशासाठी कायमची आसन व्यवस्था व प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे बाबत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मा सदस्य श्री प्रशांत शरद पुजारी यांनी रीतसर मागणी केली होती. त्या मागणीची एस टी प्रशासनाने त्वरित दखल घेवून प्लॅटफॉर्म व आसनव्यवस्था उपलब्ध करून दिल्याबाबतचे पत्र नुकतेच प्रशांत पुजारी यांना प्राप्त झाले.

कोल्हापूर ते गारगोटी, कोल्हापूर ते मुरगुड, कोल्हापूर ते मुदाळ तिट्टा मार्गे राधानगरी तसेच कोल्हापूर ते या मार्गावरील इतर मधली गावे या ठिकाणी सध्या एसटी बसेसच्या दररोज कमीत कमी 100 ते 150 फेऱ्या होतात. परिणामी फक्त या मार्गावर एसटीला दररोज लाखोंचे उत्पन्न मिळते. एस टी साठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हा गारगोटी मार्ग अत्यंत किफायतशीर आहे. त्याचबरोबर आदमापूर येथील श्री बाळूमामा देवालयाला जाण्यासाठी राज्याच्या विविध भागातून दर अमावस्येच्या यात्रेला हजारोंच्या संख्येने तसेच इतर दिवशीही अनेक भाविक जात असतात. परंतु या फायदेशीर असणाऱ्या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानकावर मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. या मार्गावरील प्रवाशांच्यासाठी आसन व्यवस्था व प्लॅटफॉर्म नसल्याने लहान मुले, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, तरुण लोक, नोकरदार, व्यावसायिक तसेच शेकडो भाविक, आजारी लोकाना उन्हात, थंडीत, पावसात तेथील एका झाडाखाली एसटीची वाट बघत उभे राहावे लागते. या मार्गावर धावणाऱ्या एसटी गाड्याही त्याच झाडाखाली थांबवल्या जातात. एसटी कर्मचाऱ्यांनी निकामी एसटीचा काही भाग कापून त्या झाडाखाली स्वतःसाठी छोटे शेड मारून घेतले आहे. वृद्ध, आजारी, लहान मुले, महिला, शिवाय दिवसभर नोकरी व्यवसाय करून दमून गेल्यानंतर नोकरदार व्यवसायिकांना स्टॅंडवर आल्यावर विसावा मिळत नाही. पर्याय नसल्याने या सर्वांना तेथील झाडाखाली निमुटपणे तासन तास गाडीची वाट बघत उभे राहावे लागते. म्हणून गारगोटी मार्गावरील प्रवाशांसाठी त्यांच्या हक्काचे आसन व्यवस्था व प्लॅटफॉर्म त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत मा श्री प्रशांत पुजारी यांनी आग्रहाची मागणी केलेली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या या मागणीची एस टी प्रशासन कोल्हापूर विभाग यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन cbs वरील फलाट क्रमांक 20 वर सदर प्रवाशांसाठी  हक्काचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला.


 या अत्यंत गरजेच्या विषयाला वाचा फोडून श्री प्रशांत पुजारी यांनी या गारगोटी रुटवरील समस्त प्रवासी वर्गाला cbs वर प्लॅटफॉर्म व आसन व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण भागात कौतुक होत आहे.