Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सुवर्ण महोत्सवी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिरोळ तालुक्याचे घवघवीत यश

जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड


शिरोळ:जिल्हा परिषद कोल्हापूर व बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित अशोकराव माने पॉलीटेक्निक वाठार तर्फ वडगाव यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या सुवर्णमहोत्सवी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शिरोळ तालुक्याने घवघवीत यश संपादन केले. त्याचबरोबर तीन उपकरणांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. शिक्षक आमदार जयंत आसगांवकर,माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर,शिक्षक नेते दादासो लाड यांचे शुभ हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.


           माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी गट ( इयत्ता 9 वी ते 12 वी ) गटामध्ये हसूर हायस्कूल हसूरच्या शुभम अनिल कुमटाळे,पार्श्व शितल पाटील यांच्या 'बहुउद्देशीय स्पेयर मशिन ' उपकरणाला द्वितीय क्रमांक मिळाला.मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा सुभाष जाधव तर मुख्याध्यापक एम.पी.खुरपे यांचे प्रोत्साहन लाभले.

             तर प्राथमिक विद्यार्थी गटामध्ये विद्या मंदिर कोंडीग्रे शाळेच्या संस्कार राजू वठारे,सुमित अतुल कांबळे यांच्या 'बहुउद्देशीय शेती यंत्राला' द्वितीय क्रमांक मिळाला.मार्गदर्शक विज्ञान शिक्षिका शर्मिला धनपाल नांद्रे, सहकार्य सुरेश चव्हाण,विशेष सहकार्य सूरज परीट,सुमित अतुल कांबळे, मुख्याध्यापक भारत सातगोंडा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

               प्राथमिक विद्यार्थी गटामध्येच तृतीय क्रमांक उर्दू विद्या मंदिर खिद्रापूरच्या आकारा अब्बास घुणके, आरिफा हमीद जमादार यांच्या 'वीजविरहित पाणी पंप' उपकरणाला मिळाला. मार्गदर्शक शिक्षक असिफ मुजावर,बुशेरा पटेल,अंजुम आरा बुखारी व मुख्याध्यापक नाजीम जमादार यांचे मार्गदर्शन लाभले.

            शिक्षक निर्मित उपकरण गटामध्ये विद्यासागर हायस्कूल अकिवाटचे श्री. दादासो आण्णा सरडे यांच्या 'बहुउद्देशीय भौमितिक पेटी ' उपकरणाला द्वितीय क्रमांक मिळाला.तांत्रिक साहाय्य सतिश आरसगोंडा (साई डिजीटल जयसिंगपूर) यांचे साहाय्य लाभले. मुख्याध्यापक दादासो वाडकर, बाहुबली विद्यापीठाचे पदाधिकारी यांचे प्रोत्साहन लाभले.

             शिरोळ तालुक्याला मिळालेल्या सुवर्णमहोत्सवी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

        सदर विद्यार्थी व शिक्षकांना केंद्रीय प्रमुख यशवंत पेठे,रियाजअहमद चौगले, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,जिल्हा उर्दू शिक्षण विस्तार अधिकारी मुसा सुतार,शिरोळचे गट शिक्षण अधिकारी दिपक कामत यांचे प्रोत्साहन लाभले.