Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड येथे मोफत आरोग्य शिबिर- सुरेश पाटील

 जेडी न्यूज कोल्हापूर संपादक सौं मंदा देशपांडे


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त (दत्तवाड ता. शिरोळ) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीमार्फत देशभक्त रत्नाप्पांना कुंभार सभागृहामध्ये मगदूम एण्डो- सर्जरी इन्स्टिट्यूट कोल्हापूर तर्फे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

या शिबिरामध्ये मोफत मूत्ररोग निदान आणि उपचार त्याचबरोबर किडनीस्टोन, प्रोस्टेट, लघवी नकळत जाणे, लघवीतून रक्त जाणे, थंडी वाजून ताप येणे, किडनी खराब होणे, अंगावर सूज येणे, लघवीचा मार्ग लहान होणे इत्यादी त्रास असणाऱ्या रुग्णांना शिबिरात मोफत तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये तज्ञांकडून 


रुग्णतपासणी, रक्त- लघवी तपासणी, युरोफ्लोमेट्री इ. चाचण्या आणि औषध उपचार पूर्णत: मोफत करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकता असणाऱ्या रुग्णांवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया व उपचार मोफत केले जाणार आहेत. तरी या शिबिराचा दत्तवाड परिसरातील गरजू रुग्णांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील- दत्तवाडकर यांनी केले आहे.