गाव बंद ठेवून पाणी परिषदेला पाठिंबा
जेडी न्यूज कोल्हापूर
इचरकंजी शहराला अमृत योजनेतून दूधगंगा नदीचे सुळकुड येथून पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून आज सुळकुड येथे होणाऱ्या पाणी परिषदेनिमित्त दतवाड गाव बंद ठेवून या परिषदेला पाठिंबा देण्यात आला
सुळकुड ता कागल येथे होणाऱ्या पाणी परिषदेला पाठिंबा देण्यासाठी व त्या सहभागी होण्यासाठी गावातील नागरिकांनी आज गाव बंद ठेवून या परिषदेत सहभागी झाले यावेळी गावातील व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून या परिषदेला पाठिंबा दिला तर दूधगंगा बचाव समिती दत्तवाड ने जाहीर केल्याप्रमाणे गावातील अनेक शेतकरी नागरिक परिषदेसाठी सुळकुडला रवाने झाले होते
दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला अमृत योजनेतून पाणी देण्यासाठी सर्वच नागरिकांचा ठाम विरोध आहे याची सरकारने दखल घेऊन ही योजना रद्द करावी यासाठी गाव बंद करून पाणी परिषदेत दतवाड येथील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले