Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

जुन्या पेन्शन संदर्भात आजच अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन : मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे

जे  डी न्यूज कोल्हापूर


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आयोजित शिक्षण परिषद व भव्य शिक्षक मेळावा अभूतपूर्व गर्दीच्या उच्चांकांत सुरुवात

   रत्नागिरी  येथील चंपक मैदानात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षक बंधू भगिनींच्या उच्चांकी गर्दीत सुरुवात झाली.

        मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांचे प्रतिमापूजनाने झाली.

          शिक्षक नेते संभाजीराव थोरात तात्या यांच्या हस्ते मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांचे हस्ते झाला. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील होते.शालेय शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर,स्वागताध्यक्ष तथा उद्योगमंत्री,पालकमंत्री रत्नागिरी ना.उदय सामंत,ना. गिरीश महाजन,आ.अनिल भाऊ बाबर, आ.योगेश जाधव,सांगोल्याचे माजी आमदार दिपक आबा साळुंखे, भैय्यासाहेब सामंत,पुरुषोत्तम जाधव,उदयसिंह पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी 

किर्ती कुमार पुजार यांच्यासह राज्य कार्यकारणी,शिक्षक बंधू -भगिनी उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

         प्रास्ताविक आबासाहेब जगताप यांनी केले.राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मांडल्या.१o८ वर्षापासूनच्या संघटनेच्या कार्याविषयी आढावा घेतला.बक्षी समितीमधील अन्याय दूर करावा, वस्तीशाळेवरील सेवा गृहीत धरावी.१०-२०- ३० आश्वासीत प्रगती योजना, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी.२०पटाखालील शाळा बंद करू नये.अशैक्षणिक कामे, बी.एल.ओ. प्रश्न,जुनी पेन्शन विषयीच्या मागणीला उपस्थित शिक्षकांनी उत्स्फू्र्त मागणी उचलून धरली.

        ना.उदय सामंत या प्रसंगी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करतील. शिक्षकांच्यामध्ये येवून शिस कांचा प्रश्न मिरविणारे नेतृत्व आपल्याला लाभले आहेत. धाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री तुमचे निर्णय धाडसाने घेतील. मुख्यमंत्र्यांच्या मागे आपण राहावं असे आवाहन केले.कोकणाबरोबरच राज्यातील प्राथमिक शिक्षक हा अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत.शिक्षक संघाचे माहितीपट व गीत सादर करण्यात आले.

         शिक्षक नेते संभाजीराव थोरात म्हणाले, स्वकर्तृत्वाने शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री बनला.वसंतदादा पाटील यांच्यानंतर सामान्यांचा धडाडीचा मुख्यमंत्री बनला याचा सार्थ अभिमान आहे.आपल्या खुमासदार शैलीत शिक्षकांच्या मागण्या मांडल्या.विविध मंत्री, सचिव व प्राथमिक शिक्षकांचा एक प्रतिनिधी घेवून एक समिती गठीत करून जुन्या पेन्शनचा प्रस्ताव सुरू करण्याविषयी घोषणा करावी.घरभाडेबाबत ग्रामसभा मंजुरीची अट काढून टाकावी.केंद्रप्रमुख भरतीबाबत शिक्षकांमधून निवड करावी. सर्वाना गणवेश मिळावा.बदल्यांचा जी.आर. बंद करा.एम.एड,एम.फील, पी.एच.डी.धारक शिक्षकांना क्लास वन अधिकाऱ्याचा दर्जा द्यावा.

            सोलापूरचे मा.आमदार दिपक आबा साळुंखे पाटील म्हणाले, राज्यातखाजगी संस्थांचे पेव फुटलेले आहे. खाजगी संस्थाच्या बरोबर स्पर्धा करुन जिल्हा परिषदेच्या शाळा प्रगती करीत आहे. प्राथमिक शिक्षकांचे उपद्रव्यमूल्य अधिक आहे. काटावरच्या उमेदवारांचा निकाल बदलण्याची ताकद आहे. म्हणून मागण्यांचा सकारात्मक विचार करावा

      शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर म्हणाले, शिक्षक हा शिक्षणाचा आत्मा असतो. विद्यार्थ्यांना न्याय देणारा शिक्षक असतो. शिक्षकांचे १८ वर्षाचे प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. एका फटक्यात ११०० कोटी रुपये मंजूर करून माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविले. १०० टक्के केंद्रप्रमुखांची पदे भरणेत येतील. पदवी प्राप्त शिक्षकांना परिक्षेसाठी बसण्यासाठी परवानगी देणेत येईल.एका वेळेला पेन्शनचा प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री साहेबांनी आवश्यक ती समिती स्थापून  न्याय द्यावा. माझा पूर्ण पाठींबा असेल. मी बोलणारा मंत्री नसून मुलांसाठी काम करून दाखविणारा मंत्री आहे. त्यासंबंधीची गणवेशाची घोषणा विधानसभेत होईल. वेळेवर शाळेत पोहचा कोणतीही अट असणार नाही. शिक्षकांच्या गाडीवर TR लिहली जावी. जेणेकरून पोलिसही गाडी पकडू शकणार नाही.आश्वासित प्रगती योजनाची शिक्षकांनाही लागू करावी यासाठी अर्थखात्याकडे पाठपुरावा केलेला आहे.वेळेवर पगार व्हावा यासाठी स्टेट बँकेसोबत चर्चा सुरु आहे. पगार थेट शिक्षकांच्या खात्यात जमा होईल. अशी योजना अंमलात आणली जाईल. शिक्षक सुद्धा प्रशासकीय अधिकारीपर्यंत पदावर जातील. 20पटाखालील शाळा बंद पडणार नाहीत. स्वच्छतागृह व कंपाऊंड बांधकामासाठी 590 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.1418 कोटी रुपयांची तरतूद वीज बिलासाठी केलेली आहे. प्रत्येक मुलाला व्यावसायिक शिक्षण दिले जाईल.कोणतेही काम करण्यासाठी कमीपणा घेकू नका.इतके शिक्षण मुलांना दया. एक सशक्त देश बनविण्याचा संकल्प आपण सर्वांनी मिळून करायचा आहे. शिक्षक हा पवित्र कार्य करीत आहेत म्हणून त्यांना कोठे राहायचे आहे? त्या ठिकाणी थांबून काम करू द्यावे. माध्यमिक शिक्षकांच्या प्रमाणेच प्राथमिक शिक्षकांनाही शिक्षक मतदारसंघासाठी मतदान करण्याची घोषणा करावी.अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली.

        महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कोविडच्या कालावधीत अतुलनीय कार्य केले आहे. शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास फटका बसतो याची जाणीव आहे. चांगल काम आपण शिक्षक मंडळी करीत आहात. मुंबईत शिक्षक भवन बांधण्यासाठी महसूलमंत्री म्हणून पुढाकार घेवून प्रश्न मार्गी लावू.

       मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे म्हणाले, शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या कार्याचा गौरव केला. मूलभूत सोईसुविधा नसलेल्या भागात शिक्षक पोहचतात. आईवडिलांनंतर शिक्षकांचे आदराचे स्थान आजही अबाधित आहे.परिस्थिती बदलली डिजीटल युग आले तरी शिक्षकांची जागा कोणासही घेता येणार नाही.शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नात कोणीही तोडू शकत नाही. शिक्षक हे विद्यार्थ्याचे ग्रोथ इंजिन आहे. शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामे कमी करा.नवीन जी.आर. काढून घरभाडे संबंधीची नोकरीच्या ठिकाणी राहण्याची अट काढून टाका.पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. वेळेवर पगार होईल. याची जबाबदारी आमची आहे. संगणक प्रशिक्षणाची वसुली थांबवा.शिक्षक भवनास जागा देण्यात येईल. नगरपालिका शाळातील प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक विचार करील. जुन्या पेन्शन संदर्भात अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री,शिक्षक प्रतिनिधी घेवून राज्यस्तरीय समिती आजच गठीत करुन सकारात्मक निर्णय घेवू. शेतकरी, सामान्य लोकांचे प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. एक नवीन पीढी घडविण्याच्या कार्याला दाद देतो. जे होणार आहे तेच आम्ही करु.जे बोलणार ते करणार. विश्वास ठेवा.आपण नक्की पुढे जावू. देण्याची इच्छाशक्ती सरकारची आहे. आपल्यातील जिव्हाळा,विश्वास, प्रेम असाच ठेवूया.

     राज्य कोषाध्यक्ष उत्तमराव वायाळ यांनी आभार मानले.