Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

उर्दु विद्या मंदिर खिद्रापूर देश पातळीवर झळकेल - दीपक कामत


जेडी न्यूज दत्तवाड 


     अनेक भौतिक सुविधांचा अभाव असतानाही खिद्रापूरच्या या उर्दू शाळाने  राज्य पातळीवर मजल मारून गावाचेच नव्हे तर तालुक्याचे नाव लौकिकास नेले आहे. हे नाव एक दिवस देशपातळीवर झळकेल असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी दीपक कामत यांनी मत व्यक्त केले.


 ते खिद्रापूर, तालुका शिरोळ येथील उर्दू विद्या मंदिरच्या  उल्लेखनीय यशाबद्दल, ग्रामपंचायत व मुस्लिम सुन्नत जमात कडून घेण्यात आलेल्या विद्यार्थी, मुख्याध्यापक व  शिक्षक वृंद यांच्या सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उर्दू विस्तार अधिकारी मुसा सुतार, तालुका विस्तार अधिकारी व सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल ओमासे, केंद्र उर्दू कुरुंदवाड व शिरोळचे केंद्रप्रमुख रियाज अहमद चौगले, केंद्र उर्दू हातकणंगलेचे केंद्र प्रमुख आयुब पटेल, मदन कुमार कांबळे , खिद्रापूरचे सरपंच सारिका कदम,उपसरपंच पूजा पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक अप्पासो मुल्ला, पोलिस पाटील दिपाली पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हा.दस्तगीर जमादार, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, मुस्लिम समाज खिद्रापूरचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व उर्दू शिक्षक भारती संघटनाचे सर्व पदाधिकारी, माजी शिक्षक, मराठी शाळेचे  मुख्याध्यापक यशवंत हलकर, ,सलीम मोकाशी, माजी सरपंच हैदरखान मोकाशी, हिदायत मुजावर, अभिनंदन सुंके,  अप्पासो मोळे,मियाखान मोकाशी,रुस्तुम मोकाशी,, द्वारपाल लडगे, इर्शाद मुजावर,अश्फाक ढालाईत, उपस्थित होते. कार्यक्रमासाठी  इनायत मुजावर, जब्बार मोकाशी ,आसिफ ढालायत, सत्तार मोकाशी,गणेश पाखरे,रमजान कागवडे, जफरुल्ला मोकाशी,अरबाज मोकाशी यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक वर्ग  व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन यासीन शिरगुप्पे, प्रस्तावना गणेश पाखरे , नाजिम जमादार तर आभार मुहम्मद आसिफ मुजावर यांनी मानले.