श्री विद्यासागर हायस्कूल येथे विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमचे आयोजन
श्री विद्यासागर हायस्कूल येथे विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमचे आयोजन
अकिवाट येथील श्री विद्यासागर हायस्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव काळे माझी उपप्राचार्य जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर हे उपस्थित होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आरोग्य व विज्ञान याविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच शाळेमध्ये विज्ञान विषयांतर्गत प्रश्नमंजुष्याचे आयोजन करण्यात आले होते या आयोजना वेळी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी गट करून सहभाग घेतला होता त्यावेळी विविध शास्त्रज्ञ व विज्ञान विषयक माहितीवर आधारित प्रश्न विचारण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान विषयाच्या अध्यापक श्री डी ए सरडे यांनी विज्ञान जीवनाचा आधार आहे हे सांगून प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री डी बी वाडकर हे होते अध्यक्ष भाषणात यांनी विज्ञान सोडून आपण एक क्षणभरी जगू शकत नाही जीवन जगताना पावलोपावली विज्ञानाचा आधार आपल्याला घ्यावा लागतो असे सांगितले याप्रसंगी सर्व विज्ञान अध्यापक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विज्ञानातील गमती जमती शोधाव्या या असे यासाठी प्रोत्साहन दिले याप्रसंगी प्रशालेतील सर्व अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.