Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

टाकळीवाडी चे मा.गणपती खोत (पी.एस.आय) यांनी कुमार विद्या मंदिर येथे कबड्डी मैदानाचा सर्व खर्च उचलला....

 टाकळीवाडी चे मा.गणपती खोत (पी.एस.आय) यांनी कुमार विद्या मंदिर  येथे कबड्डी मैदानाचा सर्व खर्च उचलला.... 


   नामदेव निर्मळे 

   टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील पी.एस.आय गणपती खोत साहेब यांनी जिल्हा परिषद शाळा कुमार विद्या मंदिर येथील कबड्डी  मैदान स्वखर्चाने बांधून देणार अशी घोषणा केली.

   गणपती खोत साहेब स्वतः या शाळेमध्ये शिकलेले आहेत. या शाळेतून ते पुढे 01/06/ 1984 रोजी पोलीस भरती झाल.आता त्यांना बढती पी.एस.आय पदी निवड झालेली आहे.

   या शाळेची कुठेतरी जाण ठेवून कबड्डी मैदान तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. ते बोलताना म्हणाले की या शाळेचे माझ्या वर उपकार आहे .कुठेतरी त्याची मला जाण आहे.


   कबड्डी मैदान 55फूट लांबी व रुंदी 45 असे भव्य बांधकाम करून मैदान तयार करण्याचे नियोजन आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.