शिरोळ टिचर्स प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शेर ए नविद विजेता तर डी.आर. इलेव्हन उपविजेता
शिरोळ टिचर्स प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शेर ए नविद विजेता तर डी.आर. इलेव्हन उपविजेता
शिरोळ तालुका शिक्षक प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा २५व२६ फेब्रुवारीला मोठया उत्साहात जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू महाराज स्टेडियम येथे संपन्न झाली.
शिरोळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या किक्रेट स्पर्धा गेली 4 वर्षे दरवर्षी सातत्याने मोठ्या उत्साहात भरविली गेली.यंदाचे 5 वे वर्ष होते. प्राथमिक शिक्षकांच्यात असणाऱ्या क्रीडा नैपुण्याला संधी देण्यासाठी शिरोळ तालुका जुनी पेन्शन संघटनेच्या संयोजनाखाली व सर्व संघटना, शिक्षक पतसंस्था,दानशूर शिक्षकांच्या सहकार्याने भरविण्यात आली होती.
शेर ए नविद हा नविद पटेल यांचा संघ विजेता ठरला. तर डी. आर.कोळी यांच्या मालकीचा संघ डी.आर. इलेव्हन हा पदार्पणातच उपविजेता ठरला.तृतीय क्रमांक मामाज रायडर्स तर चतुर्थ क्रमांक जे.के. सुपर किंग्ज यांना मिळाला. मधुरा स्पोर्टस व के.पी. वॉरियर्स यांनीही चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
दि प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरचे संचालक सर्वश्री बाळासाहेब निंबाळकर, शिवाजीराव रोडे -पाटील,गौतम वर्धन,सुनिल एडके,गजानन कांबळे,अमर वरुटे यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी पतसंस्थांचे व संघटनांचे पदाधिकारी, संघ मालक,खेळाडू व क्रिक्रेटप्रेमी उपस्थित होते.स्पर्धेत 6 संघांनी सहभाग घेतला होता.डोळयाचे पारणे फेडणारे हिरवळीचे मैदान,उत्कृष्ट नियोजन,वयाचे भान विसरुन सहभाग घेतलेले क्रिकेट खेळाडू,खिलाडूवृत्ती व संघभावनेचा नजारा पाहावयास मिळाला.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना चषक देवून सन्मानित करण्यात आले.
मॅन ऑफ द सेरीज - वसिम पटेल(शेर ए नविद)
बेस्ट बॅटसमन- संतोष ठोमके(मामाज रायडर्स)
बेस्ट बॉलर- अनिस पटेल(डी.आर.इलेव्हन)
बेस्ट विकेटकिपर-पी.के.कांबळे(जे.केसुपर किंग्ज)
बेस्ट फिल्डर- श्रीकांत बहीर ( डी.आर.इलेव्हन)
स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी तालुक्यातील पतसंस्था, संघटना पदाधिकारी, शिक्षकांनी सहकार्य केले.शिरोळ प्रिमियर लिगच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.