आंदोलन अंकुश शेतकरी वजन काटा चे भूमिपूजन
जेडी न्यूज नेटवर्क
आंदोलन अंकुशच्या वतीने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देणगीतून शिरोळ नृसिंहवाडी रोडवर ' शेतकरी वजन काटा " उभारण्याचा भूमिपूजन व देणगी जमा करण्याच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
साखर कारखान्यांच्या कडून उसाची वजनात लूट होते हे अनेक वर्षांपासून चे या भागातील शेतकऱ्यांचे दुखणे होते त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा वजन काटा असावा अशी या भागातील शेतकऱ्यांच्या मनात भावना होती. त्या मागणीतूनच शेतकरी वजन काटा उभारण्याचा आंदोलन अंकुश ने संकल्प केला होता त्यानुसार रविवारी सायंकाळी शिरोळ नृसिंहवाडी रोडवर रामचंद्र गेंडे पुजारी यांच्या जागेत काटा उभारणीच्या कामाचा शुभारंभ तालुक्यातील प्रतिष्टीत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी बोलताना आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की येत्या ऊस हंगामा पर्यंत आम्ही हा वजन काटा उभारावा म्हणून प्रयत्न करणार आहे भागातील शेतकऱ्यांनी या काट्यासाठी देणगी देण्यासाठी पुढे येऊन सहकार्य करावे.
यावेळी रामचंद गेंडे पुजारी, चंद्रकांत जोंग भोला कागले, डॉक्टर सी डी पाटील सुरेश शहापूरे सत्येंद्र खुरपे तेरवाड राजू चौगुले हसूर एन एस पाटील दत्तवाड महेश पाटील संजय शिंदे पैलवान नंदू सुतार या मान्यवरांच्या शुभहस्ते नारळ वाढवून व आंदोलन अंकुश चे पदाधिकारी व शेतकरी यांच्या साक्षीने काटा उभारणीस सुरुवात करण्यात आली.
तासात एक लाखाच्या वर देणगी जमा
काटा उभारण्यासाठी यावेळी देणगी गोळा करण्याच्या कामाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमावेळीच उपस्थित शेतकऱ्यांकडून जवळपास 1 लाख 25 हजार रुपये देणगी रोखीने व चेक स्वरूपात जमा केली गेली.