नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अमोल पुजारी बिनविरोध...
नृसिंहवाडी ग्रामपंचायत वर सध्या दत्तराज ग्राम विकास आघाडीची सत्ता असून सरपंच पद ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने उपसरपंच पद रोटेशन पद्धतीने देण्याचा निर्णय आघाडीच्या सुकाणू समितीच्या बैठकीत झाला होता या अनुषंगाने आघाडीत ठरल्याप्रमाणे उपसरपंच पूनम जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर उपसरपंच निवडीसाठी आज सोमवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीचे अध्यक्षस्थानी सरपंच पार्वती कुंभार या होत्या तर ग्राम विकास अधिकारी सचिव बीं. एन. टोणे यांची प्रमुख उपस्थिती होती तत्पूर्वी सकाळी दत्तराज ग्राम विकास आघाडीचे पदाधिकारी सुकाणू समिती यांची बैठक झाली होती यामध्ये अमोल पुजारी यांना उपसरपंच पदाची संधी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता
ग्रामपंचायत सभागृह येथे पार पडलेल्या उपसरपंच निवडीसाठी अमोल पुजारी यांचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आले यानंतर सरपंच पार्वती कुंभार यांनी अमोल पुजारी यांची बिनविरोध निवडण्याची घोषणा केली यावेळी दत्तराज ग्रामविकास आघाडीचे समर्थक कार्यकर्ते यांनी फटाक्याची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली यानंतर नूतन उपसरपंच अमोल विभुते यांची गावातून स वाद्य मिरवणूक काढण्यात आली
या बैठकीला सदस्य तानाजी निकम रमेश मोरे पुनम जाधव अनघा पुजारी विद्या कांबळे मंगल खोत चित्रा सुतार चेतन गवळी उपस्थित होते
अमोल पुजारी यांच्या निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आघाडीचे गुरु खोचरे विकास कदम बाळासाहेब कुलकर्णी मुकुंद पुजारी किरण अनुजे तंटामुक्त अध्यक्ष संतोष खोंबारे संजय गवंडी कृष्णा गवंडी अविनाश निकम दत्तात्रय पुजारी जयश्री खिरुगडे ललिता बरगाले मनीषा खोचरे। आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते