हॅपी स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
शिरोळ-
हॅपी इंग्लिश स्कूल शिरोळ येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुमोल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे चेअरमन अमोल पुजारी सचिव गुरुप्रसाद रिसबूड, यांच्या हस्ते करण्यात आले
28 फेब्रुवारी 1928 रोजी शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी रमण इफेक्ट चा शोध लावला यामुळे 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
हॅपी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध शंभर पेक्षा जास्त विज्ञान प्रयोग करून त्याची मांडणी केली होती व त्याबद्दल माहिती सह विज्ञान प्रयोगाचे महत्त्व विशद करत होते सदर विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मधुरा देशपांडे, आरती खाडे ,भक्ती साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.