हृदयस्पर्शी शिक्षक फाउंडेशन शिरोळच्या वतीने गुणीजनांचा सत्कार
हृदयस्पर्शी शिक्षक फाउंडेशन शिरोळच्या वतीने गुणीजनांचा सत्कार
शिरोळ : शिरोळ मधील प्राथमिक शिक्षक सामाजिक व शैक्षणिक उद्दिष्टांसाठी एकत्र येवून ' हदयस्पर्शी शिक्षक फाउंडेशन"ची स्थापना केली.
शिरोळ तालुक्यातील गुणीजनांचा सत्कार रविवार दि.१९ मार्च २०२३ रोजी टारे क्लब हॉल,शिरोळ येथे एका शानदार कार्यक्रमात करण्यात आला.अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल भाट होते. तर प्रमुख पाहुणे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील होते.
यावेळी उद्योजक अशोक टारे,शिक्षक बँक नूतन चेअरमन सुनिल एडके,उत्तम प्रशासन कार्य गौरव पुरस्कार शिक्षण विस्तार अधिकारी - सौ.भारती कोळी, उत्कृष्ट पत्रकारिता -प्रसिध्दी विभाग -दिलीप शिरढोणे,आदर्श मुख्याध्यापक-दत्तात्रय सुर्यवंशी, धर्नुविद्या गोल्ड मेडल विजेती कु. साक्षी सुनिल एडके, नूतन संचालक सुनिल कोळी, परशराम चव्हाण,उत्कृष्ट लोगो मयूर उत्तम कोळी, उत्कृष्ट ब्रीद वाक्य -अजित कांबळे या गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थापक नामदेव सन्नके,उपाध्यक्षा सुनंदा पाटील, शिवाजी कोळी,यशवंत कांबळे,डी.आर.कोळी,उत्तम कोळी,नूरमहंमद मुल्ला,मौला मुल्ला,संपत कोळी, संजय कोळी,बाजीराव कोळी,धनाजी आवळे,विटेकरी,विनोद कदम, कल्पना घोळवे,शीलप्रभा माळी, मॅडम,संगीता घोरपडे मॅडम, वैशाली कुन्नुरे उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष बाळासो कोळी,आभार संतोष ठोमके यांनी मानले. सूत्रसंचालन शरद सुतार यांनी केले.