Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

बाळासो निमणे यांना एम डी आर टी 2023 अमेरिका हा पुरस्कार घोषित दत्तवाड मधील ते एकमेव विमा प्रतिनिधी

 दत्तवाड


भारतीय आयुर्विमा महामंडळाचे इचलकरंजी शाखेचे विमा प्रतिनिधी श्री बाळासो अप्पासो निमने मूळ गाव दत्तवाड, रा इचलकरंजी यांनी चालू आर्थिक वर्षात दिला जाणार MDRT 2023 अमेरिका हा पुरस्कार मिळवणारे पश्चिम भागातील दत्तवाड मधील एकमेव विमाप्रतिनिधी आहेत, 

बाळासो निमणे यांचे प्राथमिक शिक्षण दत्तवाड येथील जिल्हा परिषद शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षक श्रीमती अक्काताई नेजे हायस्कूल दतवाड येथे झाले आहे ग्रामीण भागात काम करताना त्यांनी शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यवसायिक ,नोकरदार यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवून व्यवसाय वृद्धी केली आहे प्रामाणिक होतकरू मनमिळावू कष्टाळू म्हणून त्यांची गावात ओळख आहे. ते आयुर्विमा महामंडळ) LIC एजन्सी मधून कितीतरी लोकांना बचतीचे महत्व पटवून व उत्तम सेवा  देत आहेत, कमी कालावधीत त्यानी हे यश संपादन करून आपल्या भागातील नंबर वन विमा एजंट म्हणून नाव लौकिक मिळवले आहे, त्यांच्या कार्याची दखल घेऊन एल आय सी ने अमेरिकेत  Nashville, Tennessee, USA.  येथे होणाऱ्या  MDRT  क्लब सम्मेलना साठी त्यांची निवड केली आहे. त्याना श्री सतिश नवलगुंदे विकास अधिकारी इचलकरंजी यांचे मार्गदशन व सहकार्य लाभले. त्यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे