Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन "सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

 कुरुंदवाड-


प्रतिनिधी :—  येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात (दत्तधाम) "श्री स्वामी समर्थ प्रकट दिन "सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमासह "श्री स्वामी समर्थ" च्या नाम जय घोषात हजारो भाविक, सेवेकरांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात  संपन्न झाला.

   यानिमित्त सकाळी आठ वाजता भूपाळी आरती, यानंतर परब्रम्ह स्वामी महाराजांना अभिषेक करण्यात आला. सकाळी नऊ वाजता श्री स्वामीयाग, साडेदहा वाजता महानैवेद्य आरती झाली. आरती नंतर पालखी सोहळा होऊन स्वामी चरित्र सारामृत पाठाचे सामुहीक वाचन करण्यात आले. दुपारी बारा वाजता मांदीयाळी महाप्रसाद झाला. याचा हजारो भाविक व सेवेकर्यांनी लाभ घेतला.दिवस भरात विविध मानवी समस्येवर विनामूल्य मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे करण्यात आले.

    दुपारच्या सत्रात श्री स्वामी समर्थ जप, मनन,चिंतन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले .यामध्ये बालसंस्कार व युवा प्रबोधन च्या युवा युवतीने सहभाग घेऊन आध्यात्मिक कार्यक्रम सादर केला .सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा होऊन औदुंबर प्रदक्षिणा करण्यात आली. सायंकाळी साडेसहा वाजता महानैवेद्य आरती झाली. दिवसभर हजारो सेवेकर्‍यानी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ व नामजप करून आपली सेवा श्री  स्वामी समर्थ चरणी  रुजू केली. रात्री साडेआठ वाजता चरण सेवा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी  भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

   श्री स्वामी समर्थ गुरुपीठ( दत्तधाम) येथे प्रत्येक पौर्णिमेस सामूहिक एकदिवसीय श्री गुरुचरित्र वाचन पारायण सोहळा आयोजित केला जातो. दररोज सकाळी 11 ते 5 यावेळेत विविध मानवी समस्येवर विनामूल्य प्रश्नोत्तरे सेवा व भारतीय संस्कृती व अस्मिता विभाग अंतर्गत वर्षभरातील सण, वार, व्रत ,वैकेल्ये यांची माहिती व मांडणी सांगितली जाते. तसेच प्रत्येक रविवारी सकाळी 10: 30 वाजता बालसंस्कार वर्ग, युवा प्रबोधन वर्ग (प्रत्येक युवा- युवतींना करिअर विषयक मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते.) विनामूल्य विवाह संस्कार वर्ग नाव नोंदणी केली जाते .महिन्याच्या दुसऱ्या रविवारी विनामुल्य प्रश्नोत्तर प्रशिक्षण, गर्भसंस्कार व शिशुसंस्कर प्रशिक्षण,बालसंस्कार प्रशिक्षण, युवा युवतींना युवा प्रबोधन प्रशिक्षण,सहज सोप्या शब्दात वास्तुशास्त्र प्रशिक्षण, वेद विज्ञान संशोधन प्रशिक्षण,ग्राम व नागरी अभियान प्रशिक्षण आयोजित केले जाते.तसेच दर पौर्णिमेस मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाते. 80% समाजकार्य व 20% अध्यात्म या युक्तिप्रमाने स्वामीकार्य जनमानसात समजावून सांगितले जाते.


   दर रविवारी व गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा असतो. महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी दहा वाजता श्रीयंत्र व महामृत्युंजय यंत्र पूजन करून कुंकूमार्चन व हरिद्रार्चन सेवा केली जाते.

     श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त मदिंरात आकर्षक रांगोळी काढुन विविध रंगीबेरंगी फुलानी सजविण्यात आले हते.

      तसेच दररोज सकाळी 11 ते 2 व सांयकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत  महाप्रसाद असतो.यासाठी अन्नदान सेवा करण्यासाठी भाविक,सेवेकर्‍यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी गुरुपीठाशी ( जुन्या औरवाड पुलाशेजारी, नृसिंहवाडी )  संपर्क साधावा.