केंद्र सरकारच्या विविध योजनेच्या लाभार्थींचा मेळावा संपन्न
कुरुंदवाड -सुनील कानडे -
स्वातंत्र्यानंतर अनेक बाबतीत जगावर अवलंबून असलेल्या आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर बनविले आहे .शेती आणि शेतकरी यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्याने शेतकरी आत्मनिर्भर बनला असून अन्नधान्याची आयात करणार आपला देश आत निर्यातदार बनला आहे. मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देश प्रगतीपथावर असून समाजाचा आर्थिक स्तर उंचावला आहे असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.
येथील काळाराम मंदीराजवळ आयोजित लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनेच्या लाभार्थीं मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिंधिया बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश हाळवणकर होते. मंत्री सिंधिया म्हणाले, राज्यात फडणवीस आणि शिंदै यांचे डबल इंजिनचे सरकार आले आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार हाळवणकर, माजी नगराध्यक्षा मनिषा डांगे यांचे भाषण झाले. यावेळी समरजित घाटगे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे , डॉ. संजय पाटील, अशोकराव माने, राजवर्धन नाईक निंबाळकर, अँड. सुशांत पाटील, अभिजित जगदाळे, उदय डांगे, माजी सरपंच सुरगोंडा पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक अनुप मधाळे यांनी आभार मानले.