कचऱ्याची होळी करा , गरजूंना पोळी दान करा"*
कचऱ्याची होळी करा , गरजूंना पोळी दान करा"
कुरुंदवाड (प्रतिनिधी):--
- शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सौ. जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड (ता.शिरोळ) *"कचऱ्याची होळी करा , गरजूंना पोळी दान करा"* या उपक्रमांतर्गत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
येथील प्राथमिक शाळेमध्ये शेणकूट , लाकूड जाळू नका कचऱ्याची होळी करा गरजवंतांना पोळी दान करा हा उपक्रम अतिशय उत्साहात घेण्यात आला यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक विद्यासागर उळागड्डे यांनी होळी हा सण साजरा करण्या पाठी मागचा हेतू स्पष्ट केले. होली हा सण दोन दिवस साजरा केला जातो होळीच्या दिवशी दृष्ट प्रवृत्ती, वाईट गोष्टींचा विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावी, हा या सणामागील उद्देश सांगितले त्याचबरोबर धुलिवंदनाच्या दिवशी नैसर्गिक रंगाने रंग खेळावे रसायन मिश्रित रंगाचा वापर करू नये याचेही विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आली
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी घरातील सुका कचरा कापडी पिशवीत व एक पोळी शाळेत आणून दिले त्या कचऱ्याचा शाळेसमोर होळी करून पोळी आश्रम शाळा तेरवाड येथील गरीब विद्यार्थ्यांना दान करण्यात आले
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिक नलिनी काळे, .कांचनमाला बाबर , अनिल पांडव , दत्तात्रय कुरुंदवाडे , .अनिता भोई , .मिरामा बाणदार , सुनिल पवार , रेखा औरवाडे , श्रीमती मालूताई गुरव , श्रीमती सुनिता स्वामी शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.