Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

हरिबा कोळी यांच्या "साखरपुडा" कथासंग्रहास उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार.

 हरिबा कोळी यांच्या "साखरपुडा" कथासंग्रहास उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार.


दानोळी :जीवन शिक्षण विद्या मंदिर धरणग्रस्त वसाहत दानोळी येथील आदर्श शिक्षक व नवोदित लेखक,कवी -हरिबा महादेव कोळी यांच्या "साखरपुडा" या कथासंग्रहास स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी  येथील तेराव्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात "कै.विष्णू रामचंद्र कुराडे राज्यस्तरीय प्रेरणादायी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार " मिळाला आहे.

        हरिबा कोळी हे अनेक वर्षापासून कथा व कवितांचे लेखन करत असून त्यांच्या अनेक कथा - कवितांना  पारितोषिके मिळाली आहेत. या पूर्वी त्यांचा "काव्यसुमनांजली" हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. नुकताच त्यांचा "साखरपुडा" हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून सदर कथासंग्रहास उत्कृष्ट कथासंग्रह हा पुरस्कार मिळाला आहे. कोळी सरानी सामाजिक शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. तसेच  त्याना अनेक संस्थानी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन  गौरविले आहे.त्याच्या या लेखनाची नोंद घेऊन त्याच्या "साखरपुडा" या कथा संग्रहास उत्कृष्ट प्रेरणा पुरस्कार किसनराव कुराडे,श्रीकांत पाटील,मा.ग. गुरव,कवी सरकार या मान्यवरांचे हस्ते प्रदान करणेत आला.