Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

धनंजय पट्टणकुडे यांचे निधन.

 दत्तवाड.  धनंजय पट्टणकुडे यांचे दुर्दैवी  निधन 

           अशीच एक दुर्दैवी घटना घडली कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील आर.के.नगरच्या प्राथमिक शाळेतील एका तरुण शिक्षकाच्या बाबतीत. अवघी ९ वर्ष नोकरी केलेल्या धनंजय पट्टणकुडे यांची दुर्दैवी कहाणी.

            मजरेवाडी गावाशेजारी असणाऱ्या आर.के. नगर येथील वस्तीवरील मुलांची शिक्षणाची आबाळ होवू नये म्हणून वस्तीशाळा सुरु केली. याच शाळेतून वस्तीशाळा शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात झाली. १० महिन्यांच्या करारावर व केवळ १ हजार मानधनावर काम केले. नंतर प्राथमिक शिक्षकाची सेवा सुरु झाली.अवघी ९ वर्षाची सेवा झाली अन् काळाने झडप घातली. ५ मार्च २०२३ रोजी त्यांची जीवनज्योत मालवली. ही ज्योत फक्त सरांच्यापुरतीच मालवली नाही तर अख्ख्या कुटुंबाची ज्योत मालवली. कर्ता धर्ता कुटुंबप्रमुख गमावलाय. ऐन तारुण्यात त्यांच्या पत्नीला वैधव्य आले. दोन अल्पवयीन चिमणी पाखरांच आयुष्य कोण सावरणार?वृध्द माता -पित्यांची सेवा कोण करणार? कोण काळजी घेणार यांच्या कुटुंबाची? असे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.

    जर जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळाला तर किमान जगण्यापुरती तजवीज झाली असती. याचा विचार लोकप्रतिनिधी करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.आमदार,खासदार यांना सर्वसुविधा,विविध भत्यांसह पेन्शनचा लाभ मिळतो.पण शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळत नाही.ही वस्तुस्थिती आहे. याचा विचार कोण करणार?असा विचार पट्टणकुडे कुटुंबियांना निश्चितच पडला असेल.