Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

नांदणीच्या कन्या शाळेत वैविध्यपूर्ण उपक्रमांनी महिला दिन संपन्न.

 नांदणीच्या कन्या शाळेत वैविध्यपूर्ण उपक्रमांनी महिला दिन संपन्न.


नांदणी : कै.शहा तुळजाराम नागरदास कन्या विद्या मंदिर नांदणी शाळेत अकरावे बालसाहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात झाली.नांदणी  हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनीं लेझीम व झांज पथक दिंडीत सहभागी झाले होते.वेगवेळ्या वेशभूषेत मुलींनी सहभाग घेतला.

 कु.श्रावणी मिरजे हिने सर्वांचे स्वागत केले.प्रमुख पाहुणे लेखिका मेघा उळागड्डे यांनी मुलींना कविता,कथालेखन कसे करावे?याविषयी मार्गदर्शन केले.आपल्या गोष्टीतून व कथेतून संस्काराचा परिणाम कसा होतो.या विषयी मार्गदर्शन केले.व्याख्याते -सुजाता कोळी यांनी बालसंस्कार कसे होतात?संस्काराचे महत्त्व याबद्दल माहिती दिली.

व्यवस्थापन समिती सदस्या- भारती म्हेत्रे यांनी शाळेत चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे मुलींच्या मध्ये होणाऱ्या चांगल्या बदलांची माहिती दिली.शाळेने संकलन केलेले भरड धान्याची माहिती, पाककृती वरील पुस्तकाचे व मुलींनी तयार केलेल्या हस्तलिखितिचे प्रकाशन करण्यात आले. तालुका,जिल्हा व राज्यस्तरावर कराटे, बुद्धीबळ,अडथळा शर्यत,वक्तृत्त्व,फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात मुलींनी स्व -लेखन केलेल्या कविता,गोष्टी, विनोद सादर केले.नाटिका,एक पात्री , स्वगत सादर केले.शेवटच्या सत्रात "फास्ट फूड हवे की नको" यावर परिसंवाद झाला.मुलींनी ठरवले आम्ही भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ जास्त खाऊ व पालकांनी असे पदार्थ चांगले तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले.स्वागताध्यक्ष यांनी सर्व पालकांचे,मुलींचे व मान्यवरांचे आभार मानले.

             गुरुवारी सकाळी मुलींच्या फनी गेम्स घेण्यात आले.नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

        दुपारी चार वाजता स्नेह संमेलनाला सुरूवात झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासो दानोळे होते. प्रमुख पाहुणे रवींद्र कारंडे प्राध्यापक शासकीय कॄषी महाविद्यालय कोल्हापूर होते.उदघाटक ए‌स.आर.बुबणे माजी मुख्याध्यापक होते.या कार्यक्रमात राजेश संभुशेटे अध्यक्ष तालुका भारतीय ग्राहक मंच,आप्पासो लठ्ठे चेअरमन नांदणी बॅंक,अजय कारंडे उपसरपंच व अॉड बाळासो मगदूम अध्यक्ष बार असोसिएशन जयसिंगपूर यांचा नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला.

      माता पालकांच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.नंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सुत्रसंचलन विद्या खंडागळे, प्रास्ताविक  दीपाली पाटील, स्वागत अनिल कोडोले यांनी केले तर आभार प्रज्ञा पाटील यांनी केले.