श्री. बाहुबली विद्यापीठाचे.**स्व. सौ. कमल भूपाल होसकल्ले बालविकास मंदिर अकिवाट**स्व. ध. बा. चौगुले गुरूजी प्राथमिक वि.मं. अकिवाट*या शाळेमध्ये जागतिक महिला दिन* उत्साहात आणि नाविन्यपूर्ण पध्दतीने पार पडला
*श्री. बाहुबली विद्यापीठाचे.**स्व. सौ. कमल भूपाल होसकल्ले बालविकास मंदिर अकिवाट**स्व. ध. बा. चौगुले गुरूजी प्राथमिक वि.मं. अकिवाट*या शाळेमध्ये जागतिक महिला दिन* उत्साहात आणि नाविन्यपूर्ण पध्दतीने पार पडला.
*जागतिक महिला दिन* निमित्त खास माता पालकांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम
*आठवणीतली शाळा*
अध्यापनात ही माता पालकांचा सहभाग घेण्यात आला. सौ मयुरी बडीगेर यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी आपले कला कौशल्य दाखवून मार्गदर्शन केले.
माता पालकांसाठी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सहभागी होऊन माता पालकांनी आपलं बालपण जगण्याचा अनुभव घेतला.
महिलांचा आवडता विषय म्हणजे गप्पा म्हणून उत्स्फूर्त विषयावर पाल्यांच्या विकासासाठी सकारात्मक गप्पा मारण्यात आल्या. अतिशय उत्साहाने माता पालक बोलत होते.
यानंतर लहान होऊन स्वतःच्या डब्यातील जेवण एकत्रित येऊन जेवण्याचा ही आनंद अविस्मरणीय असा ठरला.
दुपारच्या कार्यक्रम मध्ये कष्ट करून मुलांना शिकवलेल्या गृहिणी आजीबाई श्रीमती कोळी आजी यांचा सन्मान करण्यात आला . बालचमुंनी आजीबाईंची मुलाखत ही घेतली.यानंतर स्पर्धेत यशस्वी माता पालकांचे बक्षीस वितरण कार्यक्रमस सर्व माता पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्या.आपल्या पाल्या बरोबर शाळेच्या आठवणीत रमून जाताना महिलांची मने नित्यक्रम मधून बाहेर पडून उल्हसित झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नुतन ग्रामपंचायत सदस्य सौ.वैशाली चौगुले सौ.कमल बडबडे श्री. आप्पासाहेब बडबडे श्री. महावीर कोथळी श्री. अजित चौगुले प्रमुख उपस्थिती होते.श्री डी बी वाडकर सर यांची प्रेरणा आणि सर्व शालेय समिती चेअरमन व सर्व सन्माननीय सदस्य यांचे मार्गदर्शन व सर्व सहकारी शिक्षक स्टाफ यांचे सहकार्य लाभले असे प्रतिपादन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पल्लवी विठ्ठल पाटील यांनी केले.